दैनिक चालू वार्ता धाड सर्कल प्रतिनिधी -सलमान नसीम अत्तार
बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे गाव धाड
धाड हे गाव जिल्हा परिषद सर्कल म्हणून ही सर्वात मोठ गाव आहे. धाड हे गाव मेन चौकीवर आहे येथून औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अजंठा, या मार्गी नेहमी वाहकांची व नागरिकांची गर्दी असते.
या गावात बस स्टेशन आहे पण बस स्टेशन मध्ये स्वच्छतेच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैर सोय होत आहे. तसेच मच्छरचे प्रमाण वाढल्याने डेंग्यू, चिकनगुनिया अश्या साथींचे आजार फैलावत आहे तसेच रुग्णाची संख्या वाढत आहे.
. धाड येथील बस स्टेशनमध्ये महिलांना किंवा पुरुषांना बाथरूम ची व्यवस्था नाही.
धाड बस स्टेशन वर येणाऱ्या प्रत्येक प्रवाश्यांना मूलभूत सुविधा मिळतच नाही.
धाडच्या व धाड सर्कल च्या नागरिका मध्ये असं प्रश्न येते कि कधी होणार या बस स्टेशन ची काया पालट .
एस टी महामंडळ याकडे कधी लक्ष देणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.