
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश नामदेव माने
जालना -शोध मोहिमेदरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी छापा मारून जालना शहरातील वाल्मीक नगर येथून एका घरातून नऊ तलवारी जप्त केल्या आहेत.
पोलिसांची नेहमीच शोधमोहीम चालू असते या मोहिमेअंतर्गत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, वाल्मिक नगर येथील शेख कलीम शेख शरीफ याने घराच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये तलवारी लपवून ठेवलेल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी काल शुक्रवारी या शेड वर छापा मारला आणि तिथे एका पत्राच्या पेटीमध्ये ठेवलेल्या नऊ तलवारी जप्त केल्या आहेत.
दरम्यान या प्रकरणी शेख कलीम शेख शरीफ याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने या तलवारी त्याचा मित्र अफरोज हाफिस पठाण, राहणार मंगळ बाजार,जालना याच्याकडून खरेदी केले असल्याचे सांगितले आहे. अफरोज पठाण याने या तलवारी कुठून खरेदी केल्या याचा तपास पोलीस करीत आहेत.दरम्यान भारतीय हत्यार कायद्यान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.