
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी- राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर– (जय संघर्ष संसदिलेल्या लढ्याला अखेर मीळाले यश.)
वाहन चालकांच्या विविध समस्या, विविध मागण्या संदर्भात जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था मागील अनेक वर्षा पासून राजकीय नेते व प्रशासकीय कार्यालये यांना निवेदन देऊन व मोर्चे आंदोलन करूण सततचा पाठपुरावा करत आलेली आहे.
त्या मागण्या सोबत एक मागणी आशी पण होती की जिप या प्रकारा मधे येणार्या पीवळ्या पाटिच्या गाड्यांना जसे की तवेरा, स्कार्पियो,बेलोरो, व्हिंगर, क्रुझर तसेच अन्य वाहनांना इतर राज्यां प्रमाणे महाराष्ट्र राज्यात पण प्रवासी वाहतुकीचे परमीट देण्यात यावे.
जय संघर्ष संस्थेच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आलेले दिसत आहे.करीता जय संघर्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर साहेब व मुंबईचे अध्यक्ष श्री विनय शहा साहेब हे वाहतूक क्षेत्रा मधे कार्यरत आसणार्या अन्य संघटकांच्या अध्यक्षांसह दि. 28/6/2022 रोजी ट्रांन्सपोर्ट कमिश्नर कार्यालय मुंबई येथे उपस्थित राहणार आसून ट्रैक्टर पासुन ट्रक पर्यंत व रिक्शा पासून बस पर्यंत सर्वच वाहनांना केल्या जाणार्या आँनलाइन चालन बाबत व स्पीड गन ध्दारे वाहनांना केले जाणार्या चालान बाबत तसेच वाहन चालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक महामंडळ,वाहन चालकांना होणारी मारहाण, प्रत्येक टोल नाक्यावर गाडीच्या कागद पत्राची विचारणा करूण पोलीसां कडून होणारी पीळवणुक, आर टि ओ चेक नाक्या वर वाहन चालकां कडून केली जाणारी अवैध वसूली या व अन्य समस्या बाबत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर व संस्थेचे नवी मुंबई अध्यक्ष श्री विनय शहा आपली मते मांडणार आहेत