
दैनिक चालु वार्ता पेनुर प्रतिनिधी -राम कराळे
लोहा तालुक्यातील मौजे. लोढेसांगवी या गावात कृषि विभाग कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत कृषि संजीवनी सप्ताह २०२२ चा शुभारंभ मा.रविशंकर चलवदे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या हस्ते
तंत्रज्ञान प्रसार व मुल्यसाखळी बळकटीकरण मोहीम दिनानिमित्त मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) समुदाय आधारीत संस्थाची मुल्यसाखळी विकास शाळा खरीप हंगाम सन २०२२ गोविंदप्रभू शेतकरी उत्पादक कंपनी लि.लोढेसांगवी.ता.लोहा.
येथे बिज प्रकीया,करण्यात आली
जागर तंत्रज्ञानाचा बि.बि.एफ.वर पेरणी
या निमित्य पेरणी करताना आपल्या नांदेड जिल्हयाचे श्री. रविशंकर चलवदे साहेब जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक नांदेड. यावेळी श्रीमती माधुरी सोनवणे मॅडम प्रकल्प उपसंचालक , तालुका कृषि अधिकारी लोहा अरून घुमनवाड , यां सर्वांनी कृषि संजिवनी सप्ताह विषयी मार्गदर्शन केले व रोहित कंपनीचे बि.बि एफ.या विषयी माहिती बि.बि.एफ. व्यवस्थापक टोपें सर यांनी माहिती दिली.सौ.लक्ष्मीबाई मारोती लोढे यांच्या शेतावर बि.बि.एफ. द्वारे पेरणी करण्यात आली. कंपनीचे संचालक मारोती किशन लोंढे, संदीप रामजी लोंढे,डिंगाबर गुणाजी लोंढे, विठठल कदम,सौ.रेखा व्यकंटी लोंढे, उपस्थित महिला शेतकरी व शेतकरी कंपनीचे सदस्य उपस्थित होते.
दिनांक 25 जुन पासून ते 1 जुलै पर्यन्त हा सप्ताह साजरा होणार असून प्रत्येक दिवशी विशेष मोहीम राबविणार आहेत. तसेच विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार,मुल्यसाखळी बळकटी करण,पौष्टिक तृणधान्य दिवस,महिला सक्षमीकरण, खत बचत,शेती पुरक वयवसाय ,इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन या सप्ताह मध्ये होणार असल्याचे मा.प्रकल्प संचालक यांनी सांगितले. या कार्यक्रम चे आभार श्री दिगंबर लोंढे यांनी मानले. तसेच या कार्यक्रम आयोजन करीत श्री सोहेल सय्यद सहाय्यक तंत्रज्ञान वयवस्थापक यांनी विशेष मेहनत घेतली.