
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदार संघामधून आ.तानाजी सावंत यांनी शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवून आमदार म्हणून निवडून आले आणि विरोधकांच्या बरोबर हात मिळवणे केली तेव्हापासून भूम परंडा वाशी तालुक्यातील शिवसैनिक त्यांच्यापासून दुरावला होता. हे सर्व ओळखून त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या विरोधात गेल्यामुळे भूम तालुक्यातील शिवसैनिकांनी त्यांच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केले व निषेध केला.मुख्य चौकामध्ये शिवसैनिकांनी एकत्र जमून त्यांच्या पुतळ्याची प्रेत यात्रा काढून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून जाहीर निषेध व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हम तुम्हारे साथ है! अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दुमदुमला यावेळी माजी उपजिल्हाप्रमुख दिलीप शाळू ,युवा सेनेचे प्रल्हाद आडागळे, शेतकरी सेनेचे माजी तालुकाप्रमुख महादेव वारे,रामभाऊ नाईकवाडी, माजी शहर प्रमुख सुनील माळी,सुनील गपाट ,उपतालुकाप्रमुख आशोक वनवे,महिला आघाडी शहर संघटक उमादेवी रणदिवे ,भाऊसाहेब सुबुगडे,प्रल्हाद वनवे, बंडू वारे मच्छिंद्र वराळे ,सुरेश वारे ,नवनाथ मस्कर, मनोहर साळुंखे ,अरविंद वारे, बाळासाहेब आवताडे ,विभाग प्रमुख जिल्हा परिषद सर्कल श्रीमंत भडके, कालिदास डोंबाळे, सिद्धेश्वर शिंदे, डॉ. नवनाथ निकम यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.