
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
लष्कराचे कंञाटीकरण करणारी योजना रद्द करण्याची आग्रही मागणी
अग्निपथ योजने विरोधात देशभरात आंदोलन सुरु असतांना शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेमोक्राॅटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि स्टुडंस फेडरेशन ऑफ इंडिया या युवा व विद्यार्थी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या निदर्शने आंदोलनास सिटू कामगार संघटना व अ.भा. जनवादी महिला संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
केद्रं सरकार कडून अग्निपथ हि योजना जाहिर करण्यात आली आहे,जी की युवा विरोधी आणि देशाच्या सुरक्षाविरोधी आहे,देशात सगळ्याच क्षेञात मोठ्या प्रमाणात कंञाटीकरण सुरु असतांना पद्धशीरपणे लष्करात मागच्या दाराने आणण्याचा कुटिल डाव केद्रं सरकार करत आहे.चार वर्षाच्या सेवेनंतर फक्त २५% युवकांना सेवते संधी मिळणार असून ७५% तरुण हे पुन्हा बेरोजगारीच्या खाईत ढकलेले जाणार आहेत. निवृत्ती वेतन,पेंशन वर होणारा खर्च टाळण्यासाठी हि योजना आणली गेली असण्याचा आव आणुन लष्कराचे कंञाटीकरण करण्याचा हा कुटिल डाव आहे.अग्निपथ योजना रद्द करुन पुर्वरत सैन्य भरती सुरु करा,केद्रं आणि राज्य सरकारच्या विविध विभागात १७ लाखाहुन अधिक रिक्त जागा तातडीने भरा, बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्या या मागणीसाठी डी.वाय.एफ.आय व एस.एफ.आयच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले.या वेळी डी.वाय.एफ.आय चे जिल्हा सचिव स्टॅलिन आडे,अंकुश माचेवाड, सीटु चे जिल्हा सरसिटणीस काॅ.गंगाधर गायकवाड, जिल्हा अध्यक्ष कॉ.उज्वला पडलवार,कॉ. करवंदा गायकवाड,पवन जगडमवार, कॉ. लता गायकवाड,मिना आरसे, कॉ. मारोती केंद्रे, कॉ. सं. ना. राठोड, कॉ. संतोष शिंदे, विक्रम पवार, सोमाजी सरोदे, सचिन खंदारे, नागेश सरोदे, विजय सरोदे,विशाल आडे,इरफान पठाण,रवी खंदारे,सचिन तेगमुपुरे,विक्रम पवार,पवन जेकेवाड ,कॉ.जयराज गायकवाड,शाम सरोदे योगेश राठोड,उदल चव्हाण, इद्रजित चव्हाण,लक्की राठोड,राहुल राठोड, केशव सरोदे, सोनाजी कांबळे, रवी खंदारे, सचिन तेगमपुरे, शामराव वाघमारे, योगेश रानडे आदी उपस्थित होती.
लष्कराचे कंञाटीकरण करणारी योजना रद्द करा,इन्क्लाब जिंदाबाद च्या घोषनांनी या वेळी युवा कार्यकर्त्यानी परीसर दणादुन सोडला होता.