
दैनिक चालू वार्ता पुणे शहर प्रतिनिधी- विशाल खुणे
दि 23 जून औरंगाबाद
दिनांक 12 जून 21 जून 2022 दरम्यान बोकुडजळगाव तालुका पैठण येथे श्रीयश अभियांत्रिकी महाविद्यालय व डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे यांच्या संयुक्त विद्यमाने 50 विद्यार्थ्यांसह राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे आयोजन केले होते “नोट मी बट यू” हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवून सामाजिक बांधिलकी म्हणून श्रीयश अभियांत्रिकी नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे. या शिबिरामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आलेले आहेत त्यामध्ये सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळेची स्वच्छता करून शिबिराचे उद्घाटन प्रा. डॉ आर एस पवार यांनी केले व प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच श्री रामेश्वर लोखंडे प्रा जयआनंद शास्त्री प्रा अनिल रोकडे व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा दत्ता खाडे उपस्थित होते.
शिबिरांमध्ये संपूर्ण गावाची स्वच्छता करण्यात आली. पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी वन विभागाच्या डोंगरावर दीडशे खड्डे खोदण्यात आले संपूर्ण गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले त्यामध्ये विशेषता वड, पिंपळ, चिंच व निंब या रोपांची रोपण करण्यात आले त्यानंतर गावकर्यां सोबत योगा करण्यात आला योगासाठी योगगुरू म्हणून डॉ उत्तम काळवणे हे लाभले होते त्यांनी सकाळी सहा वाजता गावकर्यां सोबत विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण दिले तसेच रात्री प्रसिद्ध भारूडकार अनिल मगर यांच्या भारुडाचा कार्यक्रम झाला. त्यामध्ये त्यांनी गावकऱ्यांचे प्रबोधन केले व शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले शेवटी गंगाधर महाराज राऊत मठाधिपती बोकुडजळगाव यांचे प्रवचन झाले. यामध्ये गंगाधर महाराजांनी शिक्षण घेताना चा अनुभव व शिक्षणाचे महत्त्व सांगत मुलांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल महाविद्यालय व विद्यार्थ्यांच्या आभार मानले शिबिरांमध्ये विद्यार्थ्यांकडून शिक्षण व पर्यावरणाबद्दल महत्त्व पटवून दिले. शिबिरादरम्यान गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होते.
शिबिरा बद्दल श्रीयश प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री बसवराज मंगरुळे, मुख्य कार्यकारीअधिकारी कर्नल जॉय डॅनियल व संचालक प्रभाकर म्हशाळकर यांनी यशस्वी आयोजकांचे अभिनंदन केले
या सामाजिक शिबिराच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा दत्ता खाडे प्रा पौर्णीमा मरावर, प्रा उल्का मानकरे व प्रा मालू हनुमंते तसेच विद्यार्थ्यां मधून उदय राठोड, अविनाश चव्हाण, अजय चव्हाण, जगदीश घुगे, कोमल राठोड, संभाजी शिंदे, श्रुती जगताप, आदींनी परिश्रम घेतले