
दैनिक चालु वार्ता शिरपूर प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
महात्मा फुले कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र, धुळे अंतर्गत मा. कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील, मफुकृवी राहुरी यांच्या संकल्पनेतून मॉडेल व्हिलेज प्रकल्पातून केळीपाडा ता.साक्री जिल्हा-धुळे या गावामध्ये करण्यात आली. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी.डॉ. चिंतामणी देवकर, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, धुळे हे होते तसेच व्यासपीठावर प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीमती.रुधाताई बीलकुडे,सदस्या,पंचायत समिती,साक्री, श्रीमती.रंजूताई वाळवी, सदस्या,ग्रामपंचायत,केळीपाडा, डॉ.दिनेश नांद्रे, कार्यक्रम समन्वयक, प्रा. श्रीधर देसले, उद्यानविद्या वेत्ता, डॉ. पंकज पाटील, शास्त्रज्ञ, पिक सरंक्षण, कृषि विज्ञान केंद्र, धुळे, कु.अमृता राउत, शास्त्रज्ञ, कृषि अभियांत्रिकी प्रक्रिया, कृषि विज्ञान केंद्र, धुळे, डॉ.अतिश पाटील, शास्त्रज्ञ, मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र, कृषि विज्ञान केंद्र, धुळे , डॉ.धनराज चौधरी, शास्त्रज्ञ,पशु विज्ञान व दुग्ध शास्त्र, कृषि विज्ञान केंद्र, धुळे, श्री.तानाजी सदगीर मंडळ कृषि अधिकारी,पिंपळनेर, श्री.राहुल पाटील, श्री.वनसिंग देसाई,अध्यक्ष रंगावली शेतकरी गट, केळीपाडा,प्रगतशील शेतकरी, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रशिक्षणाचे प्रास्ताविक डॉ. दिनेश नांद्रे यांनी केले, प्रास्तविका मध्ये त्यांनी मॉडेल व्हिलेज कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करत उपस्थित शेतकरी, महिला यांना माहिती दिली. तसेच शेती करत असताना शेती बरोबर शेतकरी प्रशिक्षणाचे महत्व अधोरेखित करून कृषि विज्ञान केंद्र उपक्रमाविषयी माहिती देत, यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, महिलांनी, ग्रामीण युवकांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान करत मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शना मध्ये श्रीमती.रुधाताई बीलकुडे यांनी महिला बचत गटांनी अश्या प्रकारच्या प्रशिक्षणात सहभाग घेत, उत्पन्न व उत्पादन घेत आपला आर्थिक, सामाजिक स्तर उंचावण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले..
अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये डॉ.चिंतामणी देवकर यांनी मॉडेल व्हिलेज महत्व सांगत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय निविष्टांचा वापर करत विषमुक्त शेतीच्या सेंद्रिय शेतीच्या दृष्टीने वाटचाल करणे आवश्यक आहे असे सांगितले. तसेच शेती बरोबरच कृषि प्रक्रिया क्षेत्रात तरुणांनी, महिला बचत गटांनी जास्तीत जास्त सहभाग घेत शाश्वत उत्पादनाकडे यशस्वी वाटचाल करावी असे आव्हान करत मार्गदर्शन केले.
श्री.तानाजी सदगीर यांनी कृषि विभागाच्या महत्वाच्या योजनाविषयी माहिती उपस्थित शेतकरी, महिला वर्गाला करून देत भात व नागली पिक प्रात्यक्षिक या योजने वर भर देत उपस्थितांना मार्गदर्शन केले, यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आव्हान केलेतांत्रिक मार्गदर्शना मध्ये डॉ. पंकज पाटील यांनी भात,नागली,मका पिकातील एकात्मिक कीड व रोग निदान या वर प्रकाश टाकत, रासायनिक कीटक नाशके यावरील खर्च कसा कमी करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. कु.अमृता राउत यांनी ग्राम स्तरावरील कृषि प्रक्रियेच्या संधी तर डॉ.अतिश पाटील यांनी माती पाणी परीक्षणाचे महत्व अधोरेखित करून मार्गदर्शन केले. डॉ धनराज चौधरी यांनी पशुपालानातील आहारामध्ये खनिज मिश्रणाचे महत्व सांगत मार्गदर्शन केले. प्रा.श्रीधर देसले, यांनी कांदा पिंकाचे लागवड तंत्र याविषयीची माहिती उपस्थितांना दिली. श्री.जगदीश काथेपुरी यांनी सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, श्री. रोहित कडू यांनी सुधारित भाजीपाला लागवड तंत्रयाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षण दरम्यान मान्यवरांच्या हस्ते कृषि विज्ञान केंद्रा मार्फत तापासण्यात आलेले माती परीक्षण अहवालाचे वाटप व विश्लेषण करण्यात आले व पशुधन प्रात्यक्षिकतुन खनिज मिश्रणाचे वाटप करण्यात आले. प्रशिक्षण संपन्न झाल्यावर रंगवली शेतकरी गटाच्या गांडूळखत, गांडूळ पाणी प्रकल्पाला भेट देत मार्गदर्शन केले.
या मेळाव्याचे संपूर्ण संचालन डॉ.धनराज चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.रणजीत वळवी यांनी मानले. कृषि प्रशिक्षण यशस्विते साठी केळीपाडा गावचे सरपंच, नागरिक, रंगवली शेतकरी गट आणि कृषि विज्ञान केंद्राचे अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.