
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पुणे जिल्हा -गुणाजी मोरे
पुणे : राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर राज्यभरात शिवसेना आक्रमक झालेली पहायला मिळत आहेत. अनेक शिव सैनिकांकडून आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची काही शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. यामुळे सध्या परिसरात वातावरण तापलं आहे.
ही तोडफोड नेमकी कोणी केली याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. यानंतर तानाजी सावंत आणि त्यांचे कात्रज येथील मुख्य कार्यालय आणि आणि घराबाहेर देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.