
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
पुनर्रचित शेतु अभ्यासक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी परिपूर्ण होत असल्याचा आनंद होत आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर उंचावण्यास मदत होईल असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी केले.
लोहा येथील शिक्षण विभागा मार्फत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद घेण्यात आली.तीत गटसाधन केंद्र, लोहा अंतर्गत 13 केंद्रातील सुलभकांची एकदिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी श्री सोनटक्के बोलत होते
या कार्यशाळेस प्रत्येक केंद्रातून चार याप्रमाणे सुलभक शिक्षक उपस्थित होते. कार्यशाळेच्या प्रमुख उपस्थितीत गट शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के , बालविकास अधिकारी प्रवीणकुमार चेटलावार यांनी दीपप्रज्वलन केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करत सुलभ कार्यशाळेला सुरुवात झाली. शिक्षण परिषदेचा हेतू स्पष्ट केला.
विषय साधन व्यक्ती- बिआरसी शिवकुमार कानोजवार यांनी ‘राष्ट्रीय संपादणुक सर्वेक्षण ‘या विषयावर आपल्या अभ्यासपूर्ण व ओघावत्या शैलीत परिपूर्ण सखोल मार्गदर्शन केले. ‘ नांदेड जिल्ह्याची शैक्षणिक आकडेवारी विश्लेषण स्पष्टपणे समजून घेऊन प्रगतीच्या दिशेने वर्गात प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
विषय साधनव्यक्ती हावगिराव जामकर यांनी ‘पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम’ या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले . 30 दिवसीय कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्याच्या मागील व सध्याच्या इयत्ताना जोडणारा दुवा म्हणजे पुनर्रचित सेतू अभ्यास असून तो विद्यार्थ्यांकडून नियमितपणे वर्गात पुर्ण करून घेण्याचे आवाहन केले.
बाळाजी चव्हाण( विषय साधनव्यक्ती) यांनी ‘ विद्या प्रवेश’ या विषयावर मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम 3 महिने चालणारा असल्याचे स्पष्ट करुन दृकश्राव्य च्या साहाय्याने सखोल अशी मुद्देसूद माहिती दिली.
बालाजी कातुरे यांनी ‘भारत सरकारच्या निपुण भारत मिशन- मूलभूत साक्षरता व संख्या ज्ञान’ संदर्भाने मुद्देसूद उदाहरणासह सुलभन केले. सन 2026-27 पर्यंत इयत्ता तिसरी पर्यंतचा प्रत्येक बालक मूलभूत साक्षरता आणि संख्यज्ञान यांमध्ये परिपूर्ण कसा होईल यादिशेने शाळा, शिक्षक, पालक, समाज व पर्यावेक्षकीय यंत्रणा यांनी सकारात्मक प्रतिसाद व प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
गणित संबोध सुलभक श्री मारोती केंद्रे , संगणक व प्रोजेक्टर तंञज्ञ परमेश्वर तिडके , श्री सोनकांबळे, विषय तज्ज्ञ शिक्षक ओमकार बोधनकर यांनी सहकार्य केले.
तालुका समन्वयक विषय तज्ज्ञ संजय आकोले , रामदास कस्तुरे, बापू गायकर यांनी परिश्रम घेतले.
या कार्यशाळेस विस्तार अधिकारी (शिक्षण), अंगणवाडी पर्यवेक्षिका, शिक्षकवृंद प्रशिक्षणार्थी, समग्र शिक्षा कर्मचारी, उपस्थित होते.