
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर – शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असलेल्या आमदारांनीच बंडखोरी केल्यामुळे शिवसैनिक संतापले आहेत. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी रोष व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.
इंदापूरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आणि बंडखोर आमदारांबद्दल आपला राग व्यक्त केला.यावेळी एकनाथ शिंदे गद्दार है अशा घोषणाही देण्यात आल्या.तसेच एकनाथ शिंदे यांच्या व बंडखोर आमदारांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यामुळे आता ग्रामीण भागातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.
त्यामुळे राज्यातले वातावरण तापत असल्याचे चित्र दिसत आहे. फक्त एकनाथ शिंदेच नाही तर बाकीच्या बंडखोर आमदारांच्या विरोधातही शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये संताप आता वाढत आहे.जर हे असंच चालू राहिलं तर पुर्ण महाराष्ट्रात वातावरण बिघडू शकते.
आज इंदापूर विधानसभा मतदार संघातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुका जनसंपर्क कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी कट्टर शिवसैनिक यांनी मोठ मोठ्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नावाने जयघोष करत आपण काहीही झाले तरी आपल्या सोबत आहोत असे सांगितले.
यावेळी भीमराव भोसले जिल्हा समन्वयक, संजय काळे उपजिल्हाप्रमुख, नितीनजी शिंदे तालुकाप्रमुख, महादेव सोमवंशी शहर प्रमुख, सुदर्शन रणवरे तालुका संघटक, अरुण पवार तालुका समन्वयक, पुष्पाताई घोरपडे उपजिल्हा संघटिका, सुरेखाताई लोहार तालुका संघटिका, सचिन इंगळे ,अविनाश खंडाळे, आपा डोंगरे ,मंदार डोंबाळे, धोंडीराम सोनटक्के, रामचंद्र पाचंगणे, अशोक देवकर, योगेश वाघमोडे, बंडू शेवाळे, गोरख कदम, अवधूत पाटील, सुरज काळे, संजय खंडाळे, प्रवीण देवकर ,सचिन चौगुले, शकील बेपारी, बालाजी पाटील, हनुमंत कांबळे, अंकुश गलांडे, हेमंत भोसले, योगेश कणसे, श्याम लावंड, दिलीप माने, लक्ष्मण साळुंके, श्रीमंत कुंभार, देवा मगर ,युवराज लोंढे, पांडुरंग सोनवणे, महादेव सकुंडे, बाळासो घाडगे, आदेश पवार, मोहन आरडे, जहाँगीर पठाण, सविता अनारसे, ज्योती गाडवे, ज्योती शिंदे, निमल चिंचोके, काजल वाल्मिकी, आरती मंडाले, संतोष क्षीरसागर, सुरेश बनकर, योगेश हरिहर, अनिल परदेशी आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.