
दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी -किशोर वाकोडे
बुलढाणा: दि.२५.बुलडाणा जिल्ह्यात गेल्या तीस वर्षापासून शिवसेनेचा खासदार आहे, प्रत्येक वेळी दोन आमदार जिल्ह्यातुन शिवसेनेचे असतात, मात्र यावेळी राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे हे एकमेव आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री केले.राज्यातही कॅबिनेट मंत्री पद दिलं… त्यामुळे एक प्रकारे शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलाय… त्यामुळे आघाडीतून तात्काळ बाहेर पडावे अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसैनिकांनी केली आहे.
बंडखोरांच्या समर्थनार्थ बुलढाण्यात घोषणा
एकीकडे बंडखोर आमदारांच्या विरोधात त्यांच्या मतदारसंघात शिवसैनिक आक्रमक झाले असताना बुलढाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थन मध्ये बुलढाणा जयस्तंभ चौक येथे शिवसैनिकांच्या घोषणा धर्मवीर संजय गायकवाड जिंदाबाद, आघाडी सोडा आघाडी सोडा उद्धव ठाकरे, आघाडी सोडा अशा घोषणा शिवसैनिकांनी बुलढाणा येथे दिल्या.