
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम -परंडा -वाशी विधानसभा मतदार संघामधून बंडखोर आ. तानाजी सावंत यांनी शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवून आमदार म्हणून निवडून आले आणि विरोधकांच्या बरोबर हात मिळवनी केली तेव्हापासून भूम परंडा वाशी तालुक्यातील शिवसैनिक त्यांच्यापासून दुरावला होता त्यांच्याकडे पक्षप्रमुखांनी जबाबदारी ची पदे सोपवली होती त्यामुळे शिवसैनिक त्यांचा मान राखत होते परंतु त्यांनी आता बंडखोरणन बरोबर आ तानाजी सावंत यांच्याबरोबर चिमूटभर कार्यकर्ते राहतील आणि शिवसैनिकांचा आत्मा असलेले उद्धवजी यांच्या पाठीशी शिवसैनिक खंबीरपणे उभा असल्याचे शिवसेनेचे प्रल्हाद आडागळे यांनी व्यक्त केले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर शिंतोडे उडून बंडाचे निशाण साधले आणि ते उद्धवजी ठाकरे यांच्यावर आरोप करत आहेत जरी सावंत हे बंडखोरी करून गेले असले तरी भूम-परंडा-वाशी मतदारसघावर काही फरक पडणार नाही कारण त्यांनी निवडून आल्यापासून मतदारसंघांमध्ये चार वेळा मोजक्या ठिकाणी फिरले आहे त्यांच्याबरोबर चिमूटभर कार्यकर्ते जातिल कारण ते कार्यकर्ते त्यांचेच होते.निवडून आल्यापासून उलट मतदारसंघांमध्ये न फिरल्यामुळे व जनतेची कामे न झाल्यामुळे जनतेचा रोष आम्हा शिवसैनिकांना ऐकून घ्यावा लागत होता या पुढे काय होईल ते यापुढे आत्ता शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही शिवसैनिक खंबीरपणे उभे राहणार आहोत शिवसेना पक्षप्रमुख हे शिवसैनिकांचा आत्मा असल्याचे शिवसेनेचे प्रल्हाद आडागळे यांनी सांगितले आहे.