
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांना अगदी उघडपणे पाठबळ जाहीर केले आहे. त्याचबरोबर नांदेडमध्ये आमदार कल्याणकरांच्या केसालाही कुणी धक्का लावू शकणार नाही असा इशाराही खासदार चिखलीकर यांचा नांदेडमध्ये शिवसेनेला दिला आहे. नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला.
राज्यभरात बंडखोर शिवसेना आमदारांच्या कार्यालयात तोडफोड करण्यात येत असल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी बंडखोर शिवसेना आमदार कल्याणकरांच्या केसालाही धक्का लावण्याचा दम कुणात नांदेडमध्ये नाही. मी सगळे पक्ष फिरून आलोय, कुणात किती दम आहे ते आपण चांगलेच जाणून आहोत, असा इशारा त्यांनी शिवसेनेला दिला.
आ. बालाजी कल्याणकर हे शिवसेना- भाजप युतीच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत, आम्ही सर्वांनी त्यांना निवडून आणलेले आहे. त्यामुळे नांदेडमध्ये त्यांना धक्काही लावण्याची कुणाची हिम्मत नाही, असे खासदार चिखलीकर म्हणाले.