
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:
इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजनेतंर्गत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना दीड लाख रुपये नुकसान भरपाई राज्य सरकार देणार आहे. याबाबतचा आदेश गुरुवारी काढण्यात आला आहे.
आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतः जखमी करून घेतल्यास गुन्हा करताना झालेला अपघात, अंमली पदार्थांच्या अंमलाखाली झालेला अपघात, नैसर्गिक मृत्यू किंवा मोटार शर्यतीत मृत्यू झाल्यास या योजनेतंर्गत भरपाई मिळणार नाही. विद्यार्थ्यांच्या अपघाताचे दावे लवकर निकाली निघत नसल्यामुळे विमा कंपन्यांमार्फतची योजना बंद करून त्याऐवजी सानुग्रह अनुदान देण्याची योजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली. आता या योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय व क्रीडा विभागाने घेतला आहे. त्यानुसारच ही दिलीजाईल.
विद्यार्थ्यांच्या सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचे पालक व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, गट शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांची राहील. या योजनेंतर्गत विद्यार्थ्याचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदानाची रक्कम विद्यार्थ्याची आई, विद्यार्थ्याची आई हयात नसल्यास वडील, विद्यार्थ्याची आई वडील हयात नसल्यास १८ वर्षांवरील भाऊ किंवा अविवाहित बहीण किंवा पालक यांना देण्यात येईल.
अशी दिली जाणार मदत
अपघातामुळे शस्त्रक्रिया झाल्यास रुग्णालयाचा प्रत्यक्ष खर्च किंवा कमाल खर्च – एक लाख रुपये –
• विद्यार्थ्याचा आजाराने किंवा सर्पदंशाने मृत्यू झाल्यास – दीड लाख रुपये
• क्रीडा स्पर्धेत जखमी, शाळेत जड वस्तू पडून किंवा आग, विजेचा धक्का किंवा वीज पडली – एक लाख रुपये
• अपघाती मृत्यू झाल्यास – दीड लाख रुपये
अपघातामुळे अपंगत्व आल्यास
• दोन अवयव, दोन्ही डोळे किंवा एक डो झाल्यास – एक लाख रुपये
अपघातात एक अवयव किंवा एक डोळा निकामी
झाल्यास ७५ हजार रुपये
झाल्यास – एक लाख रुपये
शा्सनाच्या क्रांतिकारी निर्णयापैकी एक राजीव गांधी
विद्यार्थी ही सुरक्षा योजना असून या निर्णयातून शासनाची विद्यार्थी व पालकांप्रती असणारे दायित्व निश्चित होऊन वंचित मधल्या वंचित घटकाला निश्चितच न्याय मिळेल.
असे- नागराज बनसोडे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, नांदेड यांनी म्हटले आहे.