
दैनिक चालु वार्ता सिल्लोड प्रतिनिधी-सुशिल वडोदे
सिल्लोड :ग्रामीण भागातल्या महिलांचं आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्याचं कार्य अविरतपणे करणार्या मदुरा फायनान्स आणि क्रेडिट अॅक्सेस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं औरंगाबाद मधील कृष्णापुरवाडी गावात एका शानदार कार्यक्रमाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ३अंगणवाड्यांना खुर्च्या आणि सतरंजी वाटप करण्यात आले
शाखा कार्यक्षेत्रातल्या अंगणवाड्यांची यासाठी निवड करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. अंगणवाडीत अनेक लहान मुले बर्याचवेळा झोपी जातात.त्यांना चांगला आराम मिळावा, यासाठी कंपनीनं हा उपक्रम हाती घेतला. मदुरा कंपनी महाराष्ट्रासह अन्य सहा राज्यांत कार्यरत असून सन २००६ साली या कंपनीची स्थापना करण्यात आल्याची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली.मदुरा कंपनीचे विभाग प्रमुख अविनाश ताले , शाखाधिकारी अनिल पवार व सहकारी दिनेश ननावरे, गणेश तिडके,सलमान पटेल ,सरपंच सुनिता भोपळात, उपसरपंच चरण बोहरे ,पालक, शिक्षिका व सहाय्यक, बचतगटांचे सभासद या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं उपस्थित होते.