
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी 50 हजार प्रोत्साहन अनुदान योजनेबाबत GR मध्ये अनेक त्रुटी आहेत त्याबाबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील साहेब यांना फोन करून कल्पना दिली व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील साहेब यांना मेल द्वारे निवेदन देण्यात आले आहे.निवेदन दिल्याबरोबरच लगेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावरती योग्य ती कारवाई करू असे फोन करून आश्वासन दिले आहे .
महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी प्रोत्साहन अनुदान योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी 2017 ते 2018 या कालावधीमध्ये कर्ज उचल व त्याची परतफेड 2018 रोजी केलेली आहे ,तसेच 2017 ते 2019 या कालावधीमध्ये उचल व त्याची परतफेड 2019 मध्ये केलेले आहे, 2019 ते 2020 या कालावधीमध्ये उचल व त्याची परतफेड 2020 पर्यंत केलेले आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे .परंतु शासनाने काढलेल्या जीआर मध्ये सदर योजनेमध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत, तरी या त्रुटी मध्ये दुरुस्ती करण्याची मागणी इंदापूर तालुक्यातील समस्त शेतकरी वर्गातून केली जात आहे.
या त्रुटी बाबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना फोन करून त्याची कल्पना दिली आहे व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार सहकार आयुक्त अनिल कवडे, सहाय्यक निबंधक इंदापूर जिजाबा गावडे यांना पण निवेदन मेल द्वारे पाठवले देण्यात आले आहे. यावेळी धैर्यशील पाटील, पवन राजे घोगरे, सचिन सावंत, छगन गायकवाड, आनंतराव घाडगे आदी शेतकरी उपस्थित होते.