
दैनिक चालु वार्ता कंधार तालुका प्रतिनिधी- माधव गोटमवाड
आपला भारत देश हा संविधान या भारतीय धर्मग्रंथावर चालतो.गेल्या सत्तरीच्या दशकात म्हणजे 25 जुन 1975 या दिवशी देशाचे तत्कालिन पंतप्रधान आदरणीया श्रीमती इंदिराजी गांधी यांनी देशात आणिबाणी लावून लोकशाही मुल्यांचा जणू खुनच केला.या मन्याड खोर्यात आणीबाणीच्या विरोधात डाॅ. भाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणीबाणीचा निषेध लढा यशस्वी केला. वेगवेगळ्या तुकड्या करुन आणीबाणीच्या विरोधात लढा देतांना अनेक आणीबाणीचा विरोध भुमिगत राहून शासनाचा विरोध केला. या आणीबाणीचा निषेध करण्यासाठी क्रांतिभुवन बहाद्दरपूरा ता कंधार येथे गेली 30 -40 वर्षा पासून आणीबाणीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करतांना डाॅ. भाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या संकल्पनेतून व डाॅ. पुरुषोत्तमजी धोंडगे साहेब यांच्या नियोजनात हा कार्यक्रम दरवर्षीच पार पडतो.
या प्रसंगी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे अध्यक्ष प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम केशवराव धोंडगे यांनी ज्या गुणवंत विद्यार्थ्यांना यापुढे शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचण येत असेलतर श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेच्या आपले शिक्षण पुर्ण करण्यासाठी साह्य करणार असे या प्रसंगी बोलून दाखवले.
आणीबाणीत जेल मध्ये स्थानबध्द असतांना भाई धोंडगे साहेबांनी केलेला दि.2/6/1975 रोजी धाडसी पत्रव्यवहार केला ती तार प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम भाऊ यांनी वाचून वाचुन दाखवली.
मा.मुख्यमंत्री साहेब,
महाराष्ट्र राज्य,मुंबई.
परभणी जिल्ह्य़ातील शेतकरी कामगार पक्षाच्या पाच स्थानबध्दांना आपण काल अटीवर सोडण्याचा आदेश दिला आहे.आभार..!
पाकिस्तानी नियाजी शत्रु कैद्याप्रमाणे आमचेवर ज्येत्यांच्या अटी लाऊन सुटकेचे औदार्य दाखऊ नका.
आम्ही देशद्रोहीपणा केला असेल तर आम्हाला दैहांताची शिक्षा करा पण निष्कारण अपमानित अटी लादुन आमचा स्वाभिमान दुखऊ नका.महाराष्ट्राची शिव परंपरा आपण राखा आणि आम्हाला लाचार व गुलाम बनऊन अभय देऊ नका.
मुक्त करावयाचे असल्यास मर्दाला शोभेल अशीच बिनशर्त सुटका करा.आमच्या शरणांगतीची स्वप्नातही अपेक्षा करु नका.हीच आमची गांधीजी व शास्त्रीजींच्या जयंती दिनी विनंती…..!—जयक्रांति
याच कार्यक्रमात श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारच्या वतीने संस्थेच्या सर्व शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम भाऊ आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मनिषा पुरुषोत्तम धोंडगे या दोघांच्या समर्थ हस्ते गुणवंताचा सत्कार केला. तसेच छ.शंभूराजे इंग्लिश मीडियम स्कूल वीर नागोजी नाईक या ज्ञानालयातील शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीधारक कुमार विक्रमादित्य पुरुषोत्तम धोंडगे या चिमुकल्याचा सत्कार विद्रोही विचवंत, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मुक्ताईसुत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शशर्करातुला करण्याचा कार्यक्रम केला.कंधार, लोहा, सोनखेड, हाळदा, नांदेड, बारुळ, दिग्रस (बु),कुरुळा, श्री शिवाजी काॅलेज कंधार, संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहा ,श्री शिवाजी विद्यामंदिर कंधार, औरंगाबाद इत्यादी शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांची शर्करा तुला करण्यात येते.हीच एकमेव श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे ही संस्था आहे.हा गुणगौरव सोहळा दरवर्षी 25 जुन रोजी घेतला जातो.
मन्याडीचा खरा वाघ म्हणजे डाॅ. भाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व आणीबाणीच्या विरोधात निषेध करणार्यां बहाद्दर स्थानबध्दकांना या वर्षात आणिबाणी सत्याग्रही म्हणून प्रमाणपत्र मिळणार आणि पेन्शन 10,000/- दरमहा 1,50000/-रुपये थकीत रक्कम मिळाली आहे. केलेल्या कामाचे चीज 44 वर्षानंतर मिळाले.पण मविआ सरकारने सत्तेत येताच हे मानधन व पेन्शन तुर्त बंद करुन अन्याय केला.
भारतात एकमेव आणीबाणीच्या विरोधात निषेधाचा आठवण दिन क्रांतिनगरीतील श्री व्दाशभुजा वैष्णवदेवी मंदिर, सर्वलोकाश्रय मंडप क्रांतिभुवन बहाद्दरपूरा ता. कंधार येथे साजरा होतो.ही महाराष्ट्राच्या दृष्टीने भुषणाची घटना म्हणावी लागेल. या आणबाणीच्या लढ्यात नेतृत्व डाॅ. भाई केशवरावजी धोंडगे, भाई गुरुनाथरावजी कुरुडे, माजी सरपंच भाई रोहिदासवजी सर्केलवाड, भाई राजेश्वरजी आंबटवाड, संभाजीराव पा.पेठकर, भाई रामरावजी पा.पेठकर, भाई बाबुरावजी पुलकुंडवार, भाई संभाजी पा.पेठकर, भाई पंढरीनारावजी कुरुडे,भाई संभाजीरावजी केंद्रे,भाई गंगारामजी पा.कदम जानापुरीकर, भाई केरबाजी पा.पेठकर, भाई शंकरराव पा.जाधव भाई बापुरावजी वाडीकर, भाई आनंदराव पा.शिंदे दाताळेकर यांना 14 चौदा महिने जेल भोगली. (1)पंढरीनाथजी कौसल्ये, (2)पंढरीनारावजी वंजे या मुक्या निषेधवीर यांच्या सहित जवळपास 60-70 आणिबाणीच्या विरोधात रानपेटवून निषेध केला.हा एक क्रांतिकारक इतिहासच म्हणावा लागेल.
आज झालेल्या आणीबाणीचा निषेध दिन (काळा दिवस)म्हणुन साजरा झाला.या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून श्री संत गाडगे महाराज काॅलेजचे प्राचार्य डाॅ.अशोकराव गवते सर तर प्रमुख पाहुणे आणीबाणी विरोधी लढ्याचे नेतृत्व करणारे, विद्रोही विचारवंत, श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे संस्थापक व संचालक आणि संस्था सचिव आणीबाणीच्या विरोधात भाई साहेब यांना सहकार्य करणारे भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब,डाॅ.प्रा.पुरुषोत्तमजी धोंडगे साहेब, अध्यक्ष- श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार डाॅ.प्रा.भाई पुरुषोत्तम केशवराव धोंडगे(अध्यक्ष-श्री शिवाजी काॅलेज कंधारचे अध्यक्ष) यांच्या सहित सर्व शाखेतील आदरणीय मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर बंधू-भगिनी आणि गुणवंत विद्यार्थी व पालक,क्रांतिभुवन बहाद्दरपूरा नगरीतील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.संस्थेच्या प्रथेप्रमाणे वंदे मातरम् राष्ट्रीय स्फूर्तीदायी गीत गाऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करुन या प्रसंगी गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थ्यींनी यांनी मनोगत व्यक्त करुन संस्थेचे,संस्थापक, सचिव आणि गुरुवर्यांचे आभार मानले.डाॅ. प्रा. पुरुषोत्तमजी धोंडगे साहेब यांनी मनोगत व्यक्त करतांना ही संस्था दीन-दुबळ्यांच्या लेकरांना शिक्षण घेता यावे या साठी निर्माण झाली. आज महाराष्ट्रात काय देशाच्या कानाकोपर्यात श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचा विद्यार्थी आपली सेवा देत आहे. एवढेच काय स्वाभिमानाने सेवा बजावत आहे.त्या मागची मेहनतवीर म्हणून डाॅ. भाई केशवरावजी धोंडगे साहेब आणि भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब यांना संबोधले जाते. 44 वर्षापुर्वी अनेकांना त्यांच्या घरच्यांनी हिणवले होते. केशवरावजी व गुरुनाथरावजी यांच्या सोबत राहील्याने तुम्हाला अटक व्हावे लागले. पण आज त्यांच्या कार्याचे फलित म्हणजे 1000/- प्रतिमहा पेंशन व दिड वर्षाची एकमुस्त रक्कम त्यांच्या खात्यात जामा झाली.सत्य केंव्हाही विजयीच होते.बाबांनी अन् गुरुनाथ काकांनी केलेल्या कामाचे फलित आहे.भाई गुरुनाथराव कुरुडे यांनी आपल्या मनोगतात नाशिक सेंट्रल जेल येथील तत्कालीन कारागृहातील परिस्थिती जिवंत विशद केली. तर डाॅ. भाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या मन्याड खोर्याच्या ढाण्या वाघाने आपल्या भाषण शैलितून उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले.तेही वयाची शंभरी पार केलेले क्रांतिकारी अधगधगता अंगार असलेले विद्रोही विचारवंत डॉ. भाई साहेबांच्या ओजस्वी वाणी पुन्हा कडाडली. पण शेवटी सर्वांना भावनाविवश करुन आता तुम्हाला काम करायचे आहे. अशी भावनिक साद घातली. शेवटी अध्यक्षीय समारोप केले. सुत्रसंचालन माजी सरपंच व संस्था उपाध्यक्ष माधवराव पेठकर सर यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांची शर्करा तुला पालकांच्या साक्षीने करुन आणिबाणीचा प्रतिकात्मक पुतळ्याची मिरवणुक मशाली,निषेधांचे काळे झेंडे सोबत शे.का.पक्षांचा लालबावटा हा ध्वज मिरवणूकीत होता.बहाद्दरपूरा येथेच वीर जिवाजी महाले यांच्या पुतळ्या पुढे आणीबाणीच्या पुतळ्यांचे दहन करुन कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी ग्रामपंचायत बहाद्दरपूराचे माजी उपसरपंच भाई गुरुनाथराव पेठकर,प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, गुरुजन,पालक, शिक्षकेतर बंधु आणि पत्रकार मित्र उपस्थित