
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
कंधार
श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारच्या परंपरेनुसार इयत्ता १०वी व १२ मध्ये सर्वप्रथम येणार्या संस्थेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करुन शर्करातुला केली जाते. कार्यक्रमास यावेळी अध्यक्ष म्हणुन संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहाचे प्राचार्य डाॅ. अशोकराव गवते साहेब होते., संस्थेचे संस्थापक संचालक आदरणीय डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेब , संस्था सचिव गुरुनाथराव कुरुडे साहेब, संस्था अध्यक्ष मा पुरुषोत्तमरावजी धोंडगे,उपाध्यक्ष माधवराव पेठकर,इ. मान्यवरांच्या उपस्थीत श्री शिवाजी विद्यालय बारुळ ता.कंधार येथील वर्ग १० वी मधुन प्रथम क्रमांक मिळविणारी कु.श्रध्दा संजय नाईक ,व १२वी मधुन कु.साक्षी बालाजी यरमलवाड या गुणवंत विद्यार्थ्यांनीचा क्रांतिभुवन बहाद्दरपुरा नगरीत सर्वलोकाश्रय मंडपात विद्यार्थ्यांचा व पालकांचा पुष्पहार व शाल देवून सन्मान पुर्वक सत्कार केला.या प्रसंगी गुणवंताची शर्करातुला करण्यात आली . शाळेचे मुख्याध्यापक श्री वट्टमवार ए. बी.वरीष्ठ शिक्षक इरलवाड के.जी.सोनटक्के एस.एम. ,उदगीरवाड सर,जोंधळे सर,प्रदिप सुर्यवंशी सर,अजीत बंडेवार सर,जाधव एच. एस. इ.उपस्थीत होते.