
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
हणेगाव, मरखेल सर्कलमध्ये गुटखा, मटका सर्रास
देगलूर:जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात अवैध धंदेही खुलेआम सुरू आहेत. हे धंदे तात्काळ बंद करावेत अशी म गणी नागरिकांतून होत आहे.
तालुक्यात असे अवैध धंदे खुलेआम सुरू असून गुटखा माफिया रात्री बे रात्री गुटख्याची ने-आण करत आहेत. अशीच स्थिती अवैध धंद्याची आहे. म टका, जुगार खुलेआम सुरू आहे. विना परवाना दारू विक्रीही होत असून, लहान खेड्यातही दारू सहज उपलब्ध होत आहे तसेच खेड्यापाड्यात, गल्लीबोळात मटका सुरू असल्याने सर्वसाम न्यांना याचा फटका बसत आहे. अवैध मटका, जुगार, दारू विक्री तत्काळ बंद होईल का ? असा सवाल नागरिक करीत आहेत.
देगलूर तालुक्यातील हणेगाव, मरखेल या सारख्या ग्रामीण भागात हप्त्याच्या जोरावर सर्व काही अवैध धंदे चालू आहे अशी चर्चा जोरदारपणे चालू नैतिकदृष्ट्या समाजात शून्य किंमत; पण जणू काही हे फार म हत्त्वाचे गुन्हेगार असल्यासारखे रोज त्यांची चर्चा चालू आहे. त्यांना हद्दपार कसे करायचे, यासाठी डोक्याला डोकी लावून अधिकारी बसले आहेत. वास्तविक या मटकामालकांना जेरीस आणायचेच ठरवले तर पोलिसांना तासाभराचा अवधी पुरेसा आहे; पण मटका बंदबरोबरच हप्ता बंद झाला नाही तर मटकामालक कधीच हद्दपार होणार नाही, अशी मरखेल, हणेगाव येथील स्थिती आहे. त्यामुळे पहिल्यांदा हप्ता बंद’ मग तासाभरात ‘मटका बंद करणे शक्य आहे. तालुक्यातील सर्व पोलिस अजिबात नाही; पण ठराविक पोलिसांना, काही अधिकाऱ्यांना मटक्याची त्याच्या मालकांची, त्यांच्या
अड्ड्याची नस आणि नस म हीत आहे. त्यांच्यावरच मटका आहे. बंदची जबाबदारी देण्याची गरज आहे. कारण या ठराविकांनीच म टका बंद करायचे मनावर घेतले तर मटका बंद अशी आशा नागरिकांना लागली आहे.
मटक्याचे परंपरेने चालत आलेले ओपन जेवू देईना आणि क्लोज झोपू देईना, हे वाक्य देगलूर शहरात तसेच तालुक्यात सत्यात उतरले आहे. शहरासह तालुक्यातील मरखेल, हणेगाव सारख्या परिसरात मटका मोठ्या जोरात सुरू आहे. शहराच्या ठिकाणांसह ग्रामीण भागातही मटका एजंटांची संख्या वाढताना दिसते आहे. मटका खेळणाऱ्यांत अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती असल्याने पैसा मिळविण्याच्या हेतूने ते चोऱ्यांसारखे गुन्हे ही करतात. यामुळेच मटका थांबला की चोऱ्यांचे प्रकार आपोआप बंद होतील, असा नागरिकांना विश्वास आहे.