
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी .
सातारा जिल्ह्यांतील खटाव तालुक्यांतील खटाव गावचे शहीद जवान सुरज प्रताप शेळके वय २३ यांना लेहू लडाख मध्ये कर्तव्य बजावित असताना वीरमरण मरण आले. गेल्या चार दिवसांपासून ते आजारी होते त्यांच्या पश्चात आई-वडील लहान छोटा भाऊ असा त्यांचा परिवार होता जवान सुरेश शेळके यांचे माध्यमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण हे खटाव येथे झालेले साडेतीन वर्षांपूर्वी भारतीय सैन्यामध्ये नुकतेच भरती झाले होते त्यांची पहिली पोस्टिंग लेह लडाख मध्ये झाली होती अडीच महिन्यापूर्वी ते खटावला आपल्या गावी सुट्टीवर आले होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते लष्करी रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार करण्या़त आले होते आजारांतून बरे झाल्यावर ते पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू झाले होते गुरुवारी सायंकाळी चार वाजता जवान सुरज शेळके यांना अचानक त्रांस झाल्यांने त्यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आलेची माहिती संपूर्ण सातारा जिल्हा तसेच खटाव सोशल मीडियांच्या माध्यमांतून समजली. त्यामुळे सातारा जिल्ह्यांसह खटाव तालुक्यांवर शोककळा निर्माण झाली. लिहू लडक मध्ये वातावरण खराब असल्याने जवान सुरज शेळके यांचे पार्थिव लष्करी तळावर आणण्यात अडचणी निर्माण होत असून सुरुवातीला दिल्ली नंतर पुणे येथे विमानाने त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी रविवारी सकाळी पोहोचणार असून त्यानंतर त्यांना अखेरची मानवंदना देऊन त्यांच्या खटाव या मूळगावी शासकीय इतमामांत अंत्यसंस्कार करण्यांत येणार आहेत. त्यांच्या पार्थिवांचे अंत्यदर्शन घेण्यांसाठी सातारा जिल्ह्यांतील प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. खटाव गावचे ग्रामस्थ यांच्याकडूंन अंत्यसंस्कारांची तयारी करण्यांत आली असून खटावकर यांची आता सुरज शेळके यांच्या पार्थिव येण्यांची अतूट वाट पाहत आहेत.