दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
आ. प्रशांत बंब मित्रमंडळातर्फे वॉर्ड क्रमांक पाच मध्ये मोफत डस्टबिन वाटप
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन परिसरात केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया व आयुष्य मंत्रालयाच्या हेल्थ मिशनला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असुन परिसरात महिला व नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लाभ होत असून गंगापूर तालुक्यातील भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे अमोल पाटील जाधव यांच्या आयोजनाखाली शिबीर संपन्न झाले .
यावेळी सरपंच मीनाताई पांडव, मा.उपसरपंच सुरेश जाधव, संकट मोचक मारुती मंदिराचे सर्व विस्वस्थ, अरीत फाऊंडेशन चे पदाधिकारी,आदि मान्यवर उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी डिजिटल साक्षरता अभियान अंतर्गत नोंदणी करण्यात आली होती.सदरील नोंदणी करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना कचराकुंडीचे वाटप करण्यात आले.