
दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
बुलडाणा:दि.२५.
स्थानिक गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथकाने जिल्हात ठिकठिकाणी अंमली पदार्थासंबंधाने गुन्हे करणार्यांचा शोध घेवून पोलीस स्टेशन शेगांव, धाड, बोराखेडी, बुलडाणा शहर, मलकापूर शहर अंतर्गत पथक व स्थानिक पोलीस स्टेशन यांनी प्रभावी कारवाई केली.गोपाल आनंदकुमार जैस्वाल, वय ४३ वर्ष, राह कालीकुर्ती, जालना, रमेश लक्ष्मण तायडे, रा. डगडाली पुरा, शेगावं, बाळु भगवान उबाळे, अण्णाभाउ साठे नगर बुलडाणा, शेख नासीर निझाम, रा.बुलंदशहर, उत्तर प्रदेश, हल्ली मुक्काम शेंगाव, जि. बुलडाणा, एकनाथ मोहन माहीत रा. आदर्श नगर, मोताळा, बाबु पंडीत जाधव, रा. भडेच लेआउट, बुलडाणा अश्या सहा व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करुन त्यांचे कडुन एकुण ४९ किलो ८४०ग्रॅम गांजा किंमती ७ लाख ९८ हजार ८० रुपये जप्त करण्यात आला आहे. कारवाई जिपो अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांचे मार्गदर्शनात पीआय गीते, पोनि विजयसिंह राजपुत, एपीआय मनिष गावंडे, पोलीस अंमलदार रामविजय राजपुत, दिपक लेकुरवाळे, प्रविण पडोळ, केदार फाळके, मधुकर रगडू, सचिन जाधव व गणेश पुरुषोत्तम पाटील पार पाडली आहे.