
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : सातारा -भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत शुक्रवारी भेट घेतली. यावेळी सागर बंगल्यात उभयतांमध्ये राज्यातील राजकीय घडामोडींवर खलबते झाली.
या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. फडणवीस यांच्या कुशल रणनीतीचे उदयनराजे यांनी कौतुक केले. त्यांनी फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. दरम्यान, या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना, आमदारांना कोणी धमक्या दिल्या, तर मला सांगा, मी आहेच, असे वक्तव्य उदयनराजेंनी केले.