
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- माधव गोटमवाड
आ.संतोष बांगर साहेब यांनी खानापूर,कळमनुरी, आखाडा बाळापूर,वारंगा,डोंगरकडा येथील शिवसैनिकांशी साधला थेट संवाद…!!!
राज्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडीत कुठल्याही दबावाला,आमिषाला बळी न पडता मातोश्रीशी इमान राखणारे,उद्धव साहेबा सोबत ठामपणे उभे राहणारे कट्टर शिवसैनिक असणारे हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांनी मुंबईहुन मतदारसंघात परतल्यानंतर सर्वसामान्य शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी आज कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील खानापूर, कळमनुरी, आखाडा बाळापूर, वारंगा,डोंगरकडा येथील शिवसैनिकांशी प्रत्यक्ष गाठीभेटी घेत थेट संवाद साधला.
यावेळी बोलताना आमदार बांगर म्हणाले की शिवसेनेने माझ्या सारख्या सर्व सामान्य कुटुंबातील माणसाला नगरसेवक,जिल्हाप्रमुख आणि आता थेट आमदार केलं,शिवसेना म्हणजे मराठी मनाचा श्वास आहे,शिवसेना म्हणजे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा आधार आहे त्यामुळे मी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेच्या भगव्या झेंड्याशी बेईमानी करणार नाही तसेच संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिक आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत,
यावेळी एकनिष्ठ आमदार संतोष बांगर साहेब यांच्या संवाद दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसेच ठिकठिकाणी नागरिकांनी आमदार बांगर यांचे जल्लोषात स्वागत केले.
यावेळी खानापूर,कळमनुरी, आखाडा बाळापूर,वारंगा,डोंगरकडा येथील सर्व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.