
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी .
सातारा जिल्ह्यांतील खटाव तालुक्यांतील खटाव गावचे शहीद जवान सुरज प्रताप शेळके यांना अवघ्या वयाच्या २३ वर्षीं यांना लेहू लडाख मध्ये कर्तव्य बजावित असताना वीरमरण मरण आले. गेल्या चार दिवसांपासून ते आजारी होते त्यांच्या पश्चांत आई-वडील लहान छोटा भाऊ असा त्यांचा परिवार होता जवान सुरज शेळके यांचे माध्यमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण हे खटाव येथे झाले. साडेतीन वर्षांपूर्वी भारतीय सैन्यामध्ये नुकतेच भरती झाले होते. त्यांची पहिली पोस्टिंग लेह लडाख मध्ये झाली होती अडीच महिन्यांपूर्वी ते खटावला आपल्या गावी सुट्टीवर आले होते. यावेळी त्यांनी नविन घर बांधण्यांचे नियोजनही केले होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते लष्करी रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार करण्या़त आले होते आजारांतून बरे झाल्यावर ते पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू झाले होते. गुरुवारी सायंकाळी चार वाजता जवान सुरज शेळके यांना अचानक त्रांस झाल्यांने त्यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आलेची माहिती संपूर्ण सातारा जिल्हा तसेच खटाव मध्ये सोशल मीडियांच्या माध्यमांतून समजली. त्यामुळे सातारा जिल्ह्यांसह खटाव तालुक्यांवर शोककळा निर्माण झाली. लेहू लडाख मध्ये वातावरण खराब असल्यांने जवान सुरज शेळके यांचे पार्थिव लष्करी तळावर आणण्यांत अडचणी निर्माण होत असून सुरुवातीला दिल्ली नंतर रात्री उशिरा पुणे येथे विमान तळावर त्यांचे पार्थिव दाखल झाल्यानंतर खाजगी वाहनांने त्यांच्या मूळगावी शनिवारी रात्री उशिरा त्यांचे पार्थिव खटावमध्ये दाखल झाले त्यांचे पार्थिंव प्रथम घरी ठेवण्यांत आले यावेळी कुटुंबांनी एकच आक्रोंश केला यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो खटाव तालुक्यांमधील हे तिसरे शहीद जवान आहेत. सुरेश शेळके यांच्या खटाव गावांतील ग्रामस्थांसह मित्र परिवार तसेच पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ नागरिक माता बहिणी भारत माता की जय ,अमर रहे सुरेश शेळके अमर रहे, जब तक सुरज चांद रहेगा सुरज मेरा नाम रहेगा! अशा घोषणा देत खटामध्ये सजविलेल्या ट्रॅक्टर मधून भव्य मिरवणूक काढण्यांत आली त्यानंतर ग्रामपंचायत चावडी चौकात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासांठी ठेवण्यांत आले यावेळी अनेकांनी पुष्पचक्र वाहत श्रद्धांजली वाहिली त्यानंतर त्यांना शासकीय इतमामांत लष्करी जवानांकडूंन हवेत गोळ्या झाडूंन अखेरची मानवंदना देण्यांत आली यावेळी सुरजच्या आई वडील आणि लहान छोट्या भावाने एकच आक्रोंश केला. दादा तू कुठे गेलास परत कधी येणार असे आपल्या लहान छोट्या भावांने एकच हंबरडा फोडला यावेळी उपस्थिंतीना अश्रूं अनावर झाले.शहीद जवान सुरज शेळके यांच्या पार्थिंवाचे अंत्यदर्शन घेण्यांसाठी सातारा जिल्ह्यांतील प्रशासकीय अधिकारी तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक आदीं मान्यवरांनी सुरज यांच्या पार्थिंवावर पुष्पचक्र अर्पण करीत श्रद्धांजली वाहिली. यावेळी लष्करी दलातील जवान, खटावचे नायब तहसिलदार जाधव सर, पुसेगांव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोंळे, उप विभागीय पोलिस अधिकारी गणेश केंद्रे तसेच खटाव गावचे ग्रामपंचायतीचे सर्व सहकारी व कर्मचारी वर्ग पोलीस पाटील यांच्यासह पंचक्रोंशीतील सर्व ज्येष्ठ नागरिक माता बहिणी व मित्रपरिवार यांच्या उपस्थिंतीत शहीद जवान सुरज शेळके यांना भावुक असा अखेरचा निरोप देण्यांत आला.