
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
सातारा ता. लिंब गावच्या हद्दीमध्ये सुरू असणाऱ्या वेश्याव्यवसाय भरून सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकून अल्पवयीन मुलीसह एकाला ताब्यांत घेतले त्यामध्ये केरळचा युवक मुख्य एजंट असल्यांचे पोलीस तपासांत समोर आले. याबाबत पोलिस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन लिंब गावच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या कॅनलजवळ एका शेड असून पत्र्यांच्या खोल्या आहेत या खोल्या शैलेंद्र शशी नायर( मूळ रा.केरळ) याने भाड्याने घेतल्या होत्या एका अल्पवयीन मुलीसह तीन महिलांना त्याने वेश्या व्यवसायांचे आमिष दाखवून परजिल्ह्यांतून साताऱ्यांत आणले त्या ठिकाणी या मुलींना वेश्या व्यवसाय करण्यांस भाग पाडून त्यांच्याकडूंन कमिशन घेत होता या प्रकारची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने छापा टाकला. यावेळी एका अल्पवयीन मुलीसह तीन महिला आणि मुख्य एजंटला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने हा प्रकार गेले काही महिन्यांपासून सुरु केला असल्यांची कबुली पोलिसांना दिली. संबंधित महिलेसह शैलेंद्र नायरवर अनैतिंक व्यापार प्रतिबंधक, तसेच बालकाचे लैगिंक अपराधापासुन संरक्षण अधिनियमाखाली पोलिसांनी सदरचा गुन्हा दाखल केला. संबंधिताकडे रात्री उशिरापर्यंत पोलिस कसून चौकशी करीत होते. सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्संल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, सहायक पोलिस अधीक्षक आँचल दलाल मॅडम पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी पोलीस उपनिरीक्षक शीतल जाधव, हवालदार सुभाष, पवार ,मालोजी चव्हाण धीरज कुंभार ,किरण जगताप पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.