दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
सातारा जिल्ह्यांमध्ये कोरोनाची चौथी लाट सुरु झाली असून सातारकरांच्या चिंतेत यामुळे भर पडली आहे गेल्या दोन आठवड्याभरात रुग्ण संख्या ५१ वर पोहोचले असून शनिवारी दिवसभरांत दोन रुग्ण पॉझिटिंव्ह आढळून आहेत. जिल्ह्यांत एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत कोरोनांची रुग्ण संख्या शून्यांवर आली होती. परंतु जून महिन्यांत एक एक करीत रुग्ण संख्या वाढू लागली. त्यामुळे सातारकरांच्या चिंतेत भर पडली चौथी लाट सुरु झाल्यांने जिल्हा आरोग्य विभाग ही सतर्क असल्यांचे दिसून येत आहे रुग्णालयांत प्रत्येकांला पुन्हा माक्स सक्ती करण्यांत आली असून नागरिकांनी सुद्धा गर्दीच्या ठिकाणे टाळावीत व माक्सचा वापर करावा असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यांत आले आहे. तसेच दुसरा डोस घेण्यांचे आवाहन आरोग्य विभागाकडूंन करण्यांत आले आहे थंडी,ताप खोकला अशी लक्षणे जाणवत असल्यांने रुग्ण तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयांत जात आहेत एका दिवसांत शनिवारी ११७ जणांनी कोरोनांची चाचणी केली यांमध्ये दोन बाधिंत आढळून आले. एकीकडे रुग्ण संख्या वाढत असली तरी दुसरीकडे दिलासा देणारी बातमी समोर येत आहे आत्तापर्यंत ५१ रुग्ण बाधित असली तरी यातील एकाही रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासली नाही पूर्वीसारखी रुग्णांची फारसी प्रकृती चिंताजनक बनत नाही त्यामुळे आरोग्य विभागांलाही मोठा दिलासा मिळत आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर नागरिक रुग्णालयांत आल्यानंतर ऍडमिट होत नाहीत घरच्या घरी उपचार घेवुन कोरोना बाधिंत रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे ही चौथी लाट तीव्र नसल्यांचे जिल्हा आरोग्य विभागाकडूंन माहिती देण्यांत आली आहे.