
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापुर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या संचालक
पदी डाळज नं १ येथील युवा सामाजिक कार्यकर्ते मकरंद बुवासाहेब जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे.
इंदापुर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. एकुण १७ जागेसाठी १७ अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विधमान संचालक श्री आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये डाळज येथील मकरंद जगताप यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विधमान संचालक श्री आप्पासाहेब जगदाळे यांनी संचालक पदाची संधी दिली आहे यापुर्वी त्यांनी डाळज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सलग १२ वर्षे संचालक म्हणून कामकाज केले आहे ते इंदापूर तालुका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष देखील आहेत.
डाळज पंचक्रोशीतील तरुण चेहरा म्हणून त्यांची निवड करण्यात आली.
या संस्थेमध्ये सर्वसामान्य शेतकरी व इतर घटकांचे आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करणार असल्याचे नवनिर्वाचित संचालक मकरंद जगताप यांनी सांगितले.