
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
मोखाडा : ठाणे-पालघर जिल्हा शिक्षक सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीत जव्हार,मोखाडा आणि विक्रमगड या सर्वसाधारण मतदार संघातून मोखाड्याचे हेमंत लहामगे आणि विक्रमगडचे प्रशांत नडगे यांनी विरोधकांना चार खानी चीत करीत बाजी मारली.निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच शिक्षक संघटना आणि गटांनी आपापले उमेदवार निवडून येण्यासाठी राजकीय डावपेच आखून ही पंचवार्षिक निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती.
सर्वसाधारण मतदार संघातून जव्हार मधून ०५ मोखाडा- ०२ आणि विक्रमगड- ०३ अशा या तीन तालुक्यातून दोन जागांसाठी तब्बल १० उमेदवार रिंगणात उतरले होते.एकूण ११७७ मतदारांपैकी जवळपास ९७ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून मतदान केले होते.त्यापैकी हेमंत लहामगे यांना सर्वाधिक ५१७ मते मिळून निवडून आले तर दुसऱ्या क्रमांकाची प्रशांत नडगे यांना ३९२ मते मिळवून ते विजयी झाले