
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
- पुणे : केंद्र सरकारच्या घोषणेमुळे शहरात प्लास्टिक पिशवी बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
यासाठी महापालिका सरसावली असून, ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षकांना देण्यात आले आहेत. मात्र, कारवाईमध्ये सातत्य नसल्याने शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची सर्रास विक्री आणि वापर सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.
अशातच केंद्र सरकारनेच संपूर्ण देशभरात १ जुलैपासून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदीची घोषणा केली आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावरील कारवाईला पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. पर्यावरणाला मारक असलेल्या प्लास्टिकचा वापर कमी व्हावा, यासाठी महापालिकेकडून सातत्याने जनजागृती करण्यात येते. दोषी विक्रेत्यांवर प्रथम कारवाई केल्यानंतर पुनरावृत्ती झाल्यास त्यांचे दुकान परवाना रद्द करण्यात येतील असे प्रशासनाने कळविले आहे.