
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- माधव गोटमवाड
संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशन प्रणित
कै.भा.प्र.पाटील डीएड मंच चा स्तुत्य व अनुकरणीय उपक्रम
महाराणा प्रताप जयंती व छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्य देऊ बळ जगण्याचे कार्यक्रम अंतर्गत खळी ता.गंगाखेड जि.परभणी येथील गरजू कुटूंब केरूबाई डिगंबर कोळी यांना शेळी भेट देण्यात आली.फाऊंडेशनच्या माध्यमातुन प्रत्येक महिन्याला एका निराधार भगिणीस मदत म्हणून शेळी भेट दिली जाते. संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशन चे परभणी व नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणचे काम अतिशय देखणे व अनुकरणीय आहे. फाऊंडेशन व मंचच्या माध्यमातून अनेक कुटूंबांना मदत केली गेली आहे. निराधार, गरीब, गरजू कुटूंबांना शिलाई मशीन देणे, घर बांधून देणे, मिरची कांडप यंत्र देणे, व्यवसायाला मदत करणे, वृक्षरोपण करणे, एक मित्र -एक पुस्तक चळवळ राबविणे, एक मित्र- एक वृक्ष चळवळ मोहीम, गरजवंतांना शेळी भेट देणे,पूरग्रस्तांना मदत असेल या सारख्या अनेक उपक्रमातून फाऊंडेशन च्या वतीने मदत करण्यात आलेली आहे. प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पूजन व चूल पेटवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविकातुन श्यामसुंदर निरस यांनी फाऊंडेशन उभारणी व मंच मधील कार्याचा थोडक्यात लेखाजोखा मांडला व संभाव्य कार्यक्रम व संकल्प व्यक्त केला. आपल्या आजूबाजूला असलेल्या निराधार गरजू कुटूंबांना जगण्याचे बळ मिळावे म्हणून मंच मधील सदस्य दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून शेळी भेट देऊन जि मदत करत आहेत ती गरजू कुटूंबांना नक्कीच बळ देण्याचे काम आहे असे मनोगत भुसारे साहेबांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच शिवाजी बाबाराव पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. विठ्ठलराव भुसारे व फाउंडेशनचे अध्यक्ष श्यामसुंदर निरस उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी गावातील मा.उपसरपंच विनायकराव सोन्नर , सुदाम गरड , डिंगाबर बावळे, रगंनाथराव पवार , महादेवराव सुरवसे आप्पाराव सुरवसे, नंदु खळीकर, सचिन सुरवसे ,बालासाहेब पवार, विठ्ठल गुंडाळकर, मोतीराम पिसाळ, रामभाऊ पवार ,बंडू सावळे, विठ्ठल पिसाळ ,मुंजा सुरवसे या सह इतर ही गावातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सरपंच शिवाजी पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर सुरवसे यांनी मानले. फाऊंडेशन व मंच मध्ये जास्तीजास्त सदस्य यांनी सहभागी व्हावे असे आव्हाहन व्यावसायिक सोनी दांपत्य व लखन उगिले यांनी केले.