
दैनिक चालु वार्ता प्रतीनीधी -महेश गोरे
लोहारा : लोहारा तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत असताना उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या माध्यमातून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या माध्यमातून दिलेले कर्ज वसुलीचा तगादा पेरणीच्या वेळेस लावल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून यामुळे सभासद व कर्जदार असलेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या सभासदा मधून नाराजीचे सूर उमटत असताना दिसत आहेत.
बँकेचे कर्मचारी सदर शेतकऱ्यांच्या घरासमोर बसत असल्यामुळे होणारी मानहानी टाळण्यासाठी सावकाराचे उंबरठे झिजवताना दिसत आहेत.
होनारी वसुली जरी नियमला धरुन असली तरी शेतकऱ्यांनी पन्नास टक्के रक्कम भरल्यानंतर किंवा संबंधित कर्जदाराला हप्ते पाडून देऊन सदरची रक्कम भरण्यासाठी वेळ देण्यात यावा माञ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व जिल्हा बँक यांनी मिळून शेतकऱ्यांना वेठीस धरून कुठलीही अंतिम नोटीस न देता नियमबाह्य वसुली चालवल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
ग्रामीण भागातील अर्थवहिनी असलेल्या जिल्हा बँकेने संकटातून बाहेर निघण्यासाठी बिगरशेती संस्थांकडे असलेली वारेमाप थकबाकी वसूल झाल्यास बँकेला चांगले दिवस येतील. तुळजाभवानी व तेरणा कारखान्यांकडे असलेली कोटय़वधींची कर्जाची थकबाकी मिळण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याची अपेक्षाही शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
जर या पुढे सक्तीची वसुली होत आसताना जर संबधीत शेतकर्याचे काही बरे वाईट झाले तर याला बॅक कर्मचारी व वसुली अधिकारी जवाबदार राहतील असे जनतेमधून बोलले जात आहे.
नवनिर्वाचित संचालक मंडळ यांनी सदरची सक्तीची वसुली थांबवली नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा कर्जदार शेतकऱ्यांनी बॅकेस दिला आहे.