
दैनिक चालु वार्ता शिरपूर प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
दि. 25/06/2022 रोजी मालकातर येथे कृषी संजीवनी मोहिमेची सुरुवात कृषी विभागाच्या वतीने करण्यात आली या प्रसंगी पंचायत समिती सभापती दादासो सत्तरसिंग पावरा यांचे हस्ते कार्यक्रमाचे उ्घाटन करण्यात आले तालुका कृषी अधिकारी श्री अनिल निकुंभ कृषि अधिकारी तुषार बैसाणे, मंडळ कृषी अधिकारी पी डी सोनवणे ,कृषी सहाय्यक दिपक पाटिल, एस एम पावरा व गावातील शेतकरी बांधव उपस्थीत होते
कृषी संजीवनी योजनेअंतर्गत श्री निकुंभ यांनी शेतकरी बांधवांना विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार व मूल्यसाखळी बळकटीकरण, म. ग्रा.रो.ह.योजना अंतर्गत फळबाग लागवड, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, माती परीक्षण या बाबतीत मार्गदर्शन केले , दिपक पटिल यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली रासायनिक खताची बचत व एक गाव एक वान बाबत
सूत्रसंचलन श्री पी डी सोनवणे यांनी केले