
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
भाजयुमोचे जिल्हाउपाद्यक्ष अमोल जाधव यांचा पुढाकार…
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे परिसरातील गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांना रविवारी शालेय साहित्य वाटप करण्यात आले हा उपक्रम आ. प्रशांत बंब मित्रमंडळाचे सदस्य तथा भाजयुमोचे जिल्हाउपाध्यक्ष अमोल जाधव यांच्या विशेच पुढाकाराने यशस्वीपणे राबवण्यात आला आहे.
दरम्यान या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या शालेय साहित्यात स्कुल बॅग, वह्या,कंपास,वॉटर बॅग, जेवणाचा डब्बा, पेन, पेन्सिल,शार्पणर, खोडरबर आदी शालेय साहित्याचा समावेश आहे या शालेय साहित्याचे वाटप आ. प्रशांत बंब मित्र मंडळाचे अमोल पाटील जाधव,संजय पांडव,धामोरीचे उपसरपंच तथा आ.बंब यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र पाटील चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ गायकवाड, भगवान गाढे, भाजपचे शहराध्यक्ष संतोष पाटील काळे, प्रा. कल्पेश गायकवाड, अब्बू लीडर, छोटू पठाण, आम्मु शेख, अक्षय चव्हाण,वाल्मिक वाकळे, आदिसह पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
प्रतिक्रिया :- अमोल जाधव ( जिल्हाउपाध्यक्ष भाजयुमो )आ. प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले असून गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात पालकांच्या हातचा रोजगार हिरवला गेला आहे, त्यामुळे लोकांच्या हातात पैसा नाही त्यातच प्रदीर्घ काळाने शाळा उघडल्याने पैश्याअभावी गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडू नये म्हणुन आम्ही आ. प्रशांत बंब मित्रमंडळाच्यावतीने आ. बंब यांच्या आदेशाने आणखी विद्यार्थ्यांची माहिती घेऊन शालेय साहित्य वाटप करणार आहे