
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा तालुक्यातील मौजे हळदव येथे पाऊस पडावा म्हणून शेतकरी शेतमजूर व समस्त गावकरी मंडळीच्या वतीने हळदव येथील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या दक्षीण मुखी श्री मारोती (हनुमान) चा भंडाऱ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
लोहा शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मौ. हळदव येथे २०१४ पासून दरवर्षी पावसाळ्यात जून महिन्यात पाऊस पडावा म्हणून श्री मारोती च्या भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते.
यंदा ही हळदव येथे श्री मारोती च्या भंडाऱ्याचे आयोजन दि.२५ जून २०२२ रोजी करण्यात आले होते हळदव परिसरातील हजारो भाविक भक्तांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच भंडाऱ्याच्या महाप्रसादानंतर रात्री ९ वाजता बालकिर्तनाचार्य विनोदाचार्य हभप सोहम महाराज काकडे रा.मोळा ता.मेहकर जि. बुलढाणा यांचा किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हळदव येथील धडाडीचे कार्यकर्ते तथा शिवा संघटनेचे लोहा तालुका उपाध्यक्ष साधू पाटील वडजे, हळदवचे माजी सरपंच भीमराव पाटील शिंदे , राम घनश्याम पवार, हनमंत भीमराव वडजे, हनमंत मधुकर वडजे, मारोती त्र्यंबक वडजे, शिवाजी पाटील पवार, सचिन पाटील वडजे, माधव वडजे, दिगांबर पवार, भारत श्रीराम कदम, सोपान पाटील शिंदे, पेमराव माली पाटील वडजे, कैलास वडजे,आनंद पवार, यांच्यासह समस्त गावकरी मंडळीनी परिश्रम घेतले अशी माहिती साधू पाटील वडजे यांनी दिली.