
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी -सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापुर तालुक्यातील कदीम शहापुर येथे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित कृषी महाविद्यालय व पशुवैद्यकीय दवाखाना शेंदुरवादा अंतर्गत भव्य पशुलसिकरणाचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पावसाळा सुरू झालेला असून पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण महत्वाचे आहे. शेतकऱ्यांमध्ये याची जनजागृती व्हावी, यादृष्टीने या शिबीराचे आयोजन केले होते. महाविद्यालयाचे विद्यार्थी शुभम देशमुख, आदित्य कांबळे, आरती पवार , सोमीनाथ दरांडे , ऋतुजा खोजे ,आदिती कुर्तडीकर, पुजा गुरव , वैभव जामुंदे ,रुपाली कायंदे , मोक्श रेडडी ,श्रीचरण डोड्डा ,ललीथ गडेपल्ली यांनी या लसिकरणाचे आयोजन केले होते. लसिकरणासाठी लाळ्या खुरकुत व फऱ्या या रोगांची लस जनावरांना देण्यात आली. एकूण १७६ जनावरांना लसी देण्यात आल्या. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. के. शेळके यांचे मार्गदर्शन लाभले तर डॉ. सचिन गायकवाड, प्राध्यापक कैलास सोळंकी आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रणिता मुळे यांचे योगदान कार्यक्रम यशस्वीतेसाठी लाभले. त्याचबरोबर पशुधन पर्यवेक्षक श्रेणी-2 मधील डॉ गणेश बारे आणि डॉ. जनार्दन चापे यांनी लसीकरण करण्यासाठी मदत केली,
गुलाब पटेल, आदीनाथ चापे, सुभाष राऊत , गणेश राऊत , राहुल राऊत , तुकाराम वीर ,राहुल चापे ,उद्धव चापे , कार्यक्रमासाठी उपस्थित होते.