
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर;पंढरपूर येथील आषाढी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या नांदेड विभागीय कार्यालयाने ता. सहा ते ता. १४ जुलै या कालावधीत २५० बस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी संजय वाळवे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग त्याचबरोबर कर्मचारी संपामुळे एसटी बस संकटात सापडली होती. मात्र, आता जवळपास सर्व सुरळीत झाले आहे. त्यामुळे यंदा पंढरपुरला आषाढी एकादशी सोहळाही मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. त्यासाठी आळंदी, देहूसह राज्याच्या विविध भागांतून पायी दिंड्या निघालेल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून नांदेड विभागीय वाहतूक अधिकारी संजय वाळवे यांनी २५० बसेस ता. सहा ते ता. कालावधीत चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
आगार परिसरातील गावातून थेट पंढरपूर येथे जाण्यासाठी व परत येण्यासाठी ४० ते ४५ प्रवाशांचा ग्रुप उपलब्ध झाल्यास गावातून थेट जादा गाडीही सोडण्याचे नियोजन केल्याचे श्री. वाळवे यांनी पत्रकात म्हटले आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संसर्गामुळे वारकऱ्यांना वारीला जाता आले आहे. यंदाच्या वर्षी वारीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे भाविकांची गर्दीही वाढली असून त्या दृष्टीने एस टी महामंडळाच्या वतीनेही आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील आगारनिहाय बस
नांदेड : ५० भोकर २६ किनवट १६ मुखेड २६देगलूर . ३१ कंधार ३६ हदगाव २१ बिलोली