
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
हाळदा:- हाळदा तालुका कंधार येथील शेतकरी घनश्याम बापुराव मोरे हे शेती ला कंटाळून दिनांक 20 6 2022 रोजी सोमवार या दिवशी शेतात विषारी औषध प्राशन केले . घनशाम मोरे यांना अगोदरच इंडियन बँक व्हीआयपी रोड नांदेड येथील बँकेचे व महिंद्रा फायनान्स कंधार यांचे कर्ज देणे होते. या चालू वर्षात खरीप हंगामात पाऊस पडल्यामुळे घनश्याम मोरे यांनी अधिक उत्पन्न काढण्यासाठी चार बॅक कापूस व तीन बॅग सोयाबीनची पेरणी केली नंतर पाऊस उघडून निसर्गाने शेतकऱ्याकडे पाठ फिरवली व दुबार पेरणीचे संकट ओढवल्या मुळे घनश्याम मोरे यांनी शेती जाऊन विषारी औषध प्राशन केले. काही शेतकऱ्यांनी बघितल्यानंतर गावातील लोकांना कल्पना दिली नातेवाईक व गावातील लोकांनी त्यांना उपचारासाठी बारूळ येथील शासकीय दवाखान्यात नेण्यात आले येथील निवासी डॉक्टरांनी त्यांना ताबडतोब डॉक्टर शंकराव चव्हाण सहकारी दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला त्यानंतर ताबडतोब आबुंलन्स करून डॉक्टर शंकरराव चव्हाण सहकारी दवाखाना विष्णुपुरी येथे उपचारार्थ दाखल केले, आणि उपचार चालू केला दरम्यान घनश्याम मोरे यांचा 25/ 6/ 2022 रोजी नांदेड येथील डॉक्टर शंकराव चव्हाण शासकीय दवाखान्यात मृत्यू झाला नांदेड येथील डॉक्टरांनी मृत घोषित करून त्यांचे शव विच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
त्यांच्यावर हाळदा ता. कंधार येथे साडेचार वाजता अंतिम संस्कार करण्यात आले.
दरवर्षी निसर्गाची उघडझाप होत असल्यामुळे दुबार पेरणीचे संकट व वाढत असलेल्या कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहेत.घनश्याम मोरे यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे