
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
आज 26 जून 2022 रोजी महा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा म्हसळा जि. रायगड यांचे वतीने राजश्री शाहू महाराज जयंती विविध कार्यक्रमानी साजरी करण्यात आली.
साने गुरुजी वाचनालयभापट येथे ज़िल्हा कार्याध्यक्ष विनयकुमार सोनवणे यांनी शाहू महाराज यांची सामाजिक न्यायाची भूमिका आणि सध्याचा सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा तसेच जादूटोणा विरोधी कायदा या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
वैज्ञानिक जाणीव कार्यवाही प्रमोद भांजी यांनी शाहू महाराज आणि शिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. आवर्जून उपस्थिती राजु काताळे यांची लाभली.
या वेळी 10 वी आणि 12 वी गुणवंत विद्यार्थी गौरव देखील करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि संपूर्ण नियोजन जयसिंग बेटकर सर यांनी केले होते.
या वेळी वृक्षारोपण देखील करण्यात आले.
यावेळी गावातील विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ देखील उपस्थित होते.