
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी .
सातारा करंजे येथील श्री. काल भैरवनाथांच्या नगरीमध्ये रामचंद्र पुरीगोसावी यांच्या नवीन नूतनीकरण इमारतीची वास्तुशांती सर्व पै. पाहुवणे तसेच गोसावी समाज बांधव व पुरीगोसावी कुटुंबातील सर्व सदस्य यांच्यासह पुरीगोसावी कुटुंबाच्या विनंतीला मान देवुन उपस्थिंतीत असणारे निमंत्रित मंडळी यांच्या उपस्थिंतीत नूतनीकरण नव्या इमारतीची वास्तुशांती उत्साहांत संपन्न झाली. रामचंद्र बापूपुरी पुरीगोसावी हे मुळचे सातारा जिल्ह्यांतील करंजखोप या गावचे रहिवासी असून ते सन १९८१ सालापासून आपल्या कुटुंबासह सातारा करंजे पेठमध्ये वास्तव्यांस आहेत. रामचंद्र पुरीगोसावी यांच्या तिन्ही मुलांनी इमारतीच्या पायाभरणी पासून ते अगदी काम पूर्ण होईपर्यंत खूप मेहनत घेतली. त्यांच्या मुलासहीत पुरीगोसावी कुटुंबातील सर्व भावंडांचे त्यांना चांगलेच सहकार्य लाभले. रामचंद्र पुरीगोसावी यांच्या वास्तु शांती निमिंत्त जावली तालुक्यांचे सभापती ह. भ. प सौ. जयश्री ताई गिरी व दशनाम गोसावी समाजांचे जिल्हा अध्यक्ष मा. जगन्नाथ गिरीगोसावी उर्फ तात्या या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नूतनीकरण इमारतीचे रिबीन कापून उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी सायंकाळी जय मल्हार जागरण गोंधळ सौ. आशाताई शिंदे सातारकर बुवा यांच्या मार्गदर्शनाखांली वेळेचे बंधन पाळून तसेच शाहुपुरी पोलिस स्टेशनच्या परवानगी वरुन कार्यक्रम उत्साहांत पार पडला. यावेळी पुरीगोसावी परिवारांकडूंन येणाऱ्या सर्व पै. पाहुण्यांचे व निमंत्रित मंडळींचे भव्य स्वागत करण्यांत आले. नूतनीकरण इमारतीमध्ये स्नेह भोजनांची व्यवस्था पुरीगोसावी परिवारांकडूंन करण्यांत आली होती.