
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
दैनंदिन जीवनात तणावाचे व्यवस्थपान करण्यामध्ये आपण यशस्वी झालो तर मनात रगाचा संचय निर्माण होऊ शकत नाही .हे वास्तविक सत्य आहे .आपल्याला अधुन मधुन प्रचंड अनावर होणारा राग येत असतो .तो येण स्वभाविक आहे आणि हा प्रचंड राग एकाएकी येत नाही तर तो अनेक दिवसांपासून आपल्या मनात एक प्रकारचा वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने जो तणाव संचय निर्माण झालेला असतो .त्याच रूपांतर रागात होत असत. वास्तविक जीवन आणि सुख दुःख हे समीकरण असतं. आणि व्यक्ती कोणीही असला तरी जीवनातील सुख दुःख यापासून सुटका हि कोणालाही शक्य नाही तरी सुद्धा दैनंदिन अनेक विषयांच्या अनुषंगाने आपल्या मनात सकारात्मक आणि नकारात्मक विचार निर्माण होता असतात .वारंवार निर्माण होणारे नकारात्मक विचार हे तणावात रूपांतर करत असतात आणि हाळुहळु निर्माण होणाऱ्या या तणावाचे शेवटी प्रचंड रागात रूपांतर होते. म्हणजे राग हा कुठल्याही प्रकारचा असो एका क्षणात निर्माण होत नाही तो निर्माण तो एक एक टप्प्याने आणि याच वेळी आपण नेमकं दुर्लक्ष करतो . आणि यावेळी जर आपण हि परस्थिती ओळखु शकलो तर मग मात्र आपण प्रचंड अशा येणाऱ्या रागा पासुन स्वतः ला वाचवु शकतो . यासाठी दैनंदिन नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे . आहार , दैनंदिन व्यवस्थित संवाद , वाचन , अध्यात्मिक वाचन खुप महत्वपूर्ण आहे . तेव्हाच दैनंदिन आपण अगदी तणाव मुक्त राहु शकतो .आणि पर्यायाने तणाण मुक्त रहीलो तर आपली सुटका प्रचंड अशा येणाऱ्या रागापासुन होऊ शकते. म्हणजे जीवनात येणारा प्रचंड राग आणि त्यामुळे होणार आपलं प्रचंड नुकसान थांबु शकत.व त्याचे आपल्या जीवनावरील विपरीत परिणामही आपण कुठं तरी नियंत्रित करू शकतो. म्हणून तणाव मुक्ति हि खूप आवश्यक आहे. आणि आपण ती नक्कीच करू शकतो . त्यासाठी आपण कितीही व्यस्तता असली तरी दिवसभरात शरिरासाठी साधारणतः एका तसाचा वेळ आपण दिला पाहिजे. जेणेकरून निर्माण झालेला थोडा तणाव त्याच दिवशी संपुष्टात येईल . तसेच संवाद म्हणजे एक आठवड्याच्या दरम्यान आपल्यला मानसिक स्थैर्य मिळेल मन शांत होईल .असा संवाद झालाच पाहिजे . संवाद हे तणाव मुक्ति चे अगदी सुयोग्य साधन आहे . आपण ज्या व्यक्तिशी संवाद साधल्या नंतर मनाला हलकं वाटलं मन शांती मिळाली तर अशा व्यक्ती सोबत अंहकार बाजुला ठेवून आवश्यकतेनुसार वैचारिक संवाद साधला पाहिजे . असे शब्द आपल्या कानावर पडताच क्षणी आपण तणावमुक्त झाल्यासारखे आपल्यला वाटत असतं . आणि त्यामुळे निर्माण होणारा तणाव त्याचे रागात होणार रुपांतर जगीच संपुष्टात येत . दैनंदिन जीवनात वाचन मग ते काही पण वाचा पण आवश्यक आहे आणि त्यामध्ये हि अध्यात्मिक वाचन केले तर उत्तम आहे .आणि या पद्धतीने आपण आपल्या जीवनात निर्माण होणारा शारिरिक मानसिक तणाव कमी करू शकतो आणि पर्यायाने त्याचे रागात होणार रुपांतर आपण नक्कीच थांबवु शकतो . आणि एक ज्ञान पुर्ण शांत स्थिर जीवन आपण जगु शकतो .
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301