
दैनिक चालु वार्ता पारनेर प्रतिनिधी-विजय उंडे
पानोली/पारनेर:-आज पानोली येथे सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या साठा बंधाराचे भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष आझाद भाऊ ठुबे तसेच राहुल पाटील शिंदे व डॉ. श्रीकांत पठारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. सदर बंधारासाठी गेले अनेक वर्षापासूनची ग्रामस्थांची मागणी होती. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सदर बंधारासाठी १५.००लक्ष रु. मंजूर करून दिले. सदर बंधाराला निधी उपलब्ध झाल्याने गाडेकर मळा तसेच भगत मळा दोन्ही भागातील लोकांना सदर बंधाराचा फायदा होणार आहे. यावेळी तालुक्यातील सर्व पक्षीय लोक उपस्थीत होते.
यावेळी सुजित झावरे पाटील म्हणाले की, सद्याच्या वातावरणात कोणता राजकीय पक्ष कोणा बरोबर आघाडी किंवा युती करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सामान्य माणसाला नेमक कोणा बरोबर जावं हा प्रश्न पडणं सहाजिकच आहे. त्यामुळं या पुढील काळातील निवडणुका या पक्षा पेक्षा व्यक्ती कडे पाहून होतील असे वाटते.
यावेळी कार्यक्रमास अमोलशेठ मैड, सतीश पिंपरकर, बी ए भगत, मारूती राव गायकवाड, दादाभाऊ वारे, इंद्रभान मामा गाडेकर, संजय भगत, शशिकांत भगत, बाळासाहेब गाडेकर, श्यामराव गाडेकर, कुंडलिक भगत, शिवाजी पवार, भागवत गायकवाड, स्वप्नील गायकवाड, अंकुश गायकवाड, दादाभाऊ शिंदे, हरिभाऊ गायकवाड, संदीप शिंदे, भानुदास शिंदे, आर डी शिंदे, रामदास शिंदे, शरद गायकवाड, उमेश गायकवाड, श्यामराव गायकवाड, पानोली गावातील तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.