
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम :(प्रतिनिधी) दरवर्षी प्रमाणे श्री अलमप्रभु देवस्थान येथून दिनांक २६ जून २०२२ रोजी सद्गुरुदेव परमहंस स्वामी श्री निखीलेश्वरानंदजी पालखी यात्रेची सुरुवात श्रीक्षेत्र अलामप्रभू देवस्थान भूम येथून करण्यात आली.हि पालखी यात्रा भूम पासून सुरवात होऊन निखीलचेतना केंद्र हैद्राबाद येथे गुरुपुर्णिमा उत्सवासाठी जाते.हि पालखी यात्रा सुमारे ४५० किलोमीटर पायी प्रवास पूर्ण करते.भूम पासून हैद्राबाद पर्यत जात असताना बरेच साधक या पालखीयात्रेमध्ये सहभागी होतात.भारताची प्राचीन गुरु शिष्य परंपरे चा तसेच साधना मार्गाचा प्रचार प्रसार करण्यासाठी सद्गुरुदेव श्री अनिलकुमार जोशीजी यांनी हैद्राबाद येथे श्री निखीलचेतना केंद्राची स्थापना केलेली आहे.दरवर्षी हैद्राबाद निखिल चेतना केंद्र मध्ये मोठ्या प्रमाणात गुरुपुर्णिमा उत्सव साजरा केला जातो.त्या सोहळ्यामध्ये सामील होण्यासाठी हि पालखी यात्रा जाते मागील १५ वर्षापासून हि पालखीयात्रा सुरु असून चालू वर्ष हे या यात्रेचे १६ वे वर्ष आहे.या पालखीयात्रेसाठी निखील चेतना केंद्र भूमचे रोहन जाधव, बाळासाहेब वाघमारे,अविनाश बाराते,प्रेमानंद महाजन,राजू उपरे,मयूर चांडगे,अनिल माळी,संजय सुर्वे,सिद्धेश्वर सुतार, गणेश गायकवाड,सुनील दाभाडे,संजय काकडे,दिनानाथ फुले,बाप्पा कांबळे,मुकुंद वाघमारे,गजानन बाराते,अरुण (नंदू) देशमुख,अरुण क्षीरसागर,महेश पाचंगे , सुरज शिंदे,सागर शिंदे, इत्यादि साधक परिश्रम घेत आहेत.