
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी -आपसिंग पाडवी
मोलगी येथील अनुदानित आश्रम शाळा व डाँ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या संयूक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम संपन्न झाला
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहा पोलीस निरीक्षक धनराज निळे,बार्टीचे समतादूत ब्रिजलाल पाडवी, अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सुमित्रा वसावे,शितल वसावे आदी उपस्थित होते. सर्व प्रथम छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन सहा.पोलीस निरिक्षक धनराज निळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता म्हणून मोलगी येथील विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक डाँ,एस टी जाधव होते.यावेळी प्रा.जाधव यांनी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले तसेच आजचा तरुण हा व्यसनाधीन होत आहे म्हणुन मुलांना व्ससन न करण्याचे आव्हान केले तसेच अनिसच्या सुमित्रा वसावे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सामाजिक कार्य,व्यसनमुक्ती या विषयावर मार्गदर्शन केले. सहा. पोलीस निरिक्षक धनराज निळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन करुन सामूहिक व्यसनमुक्तीची शपथ घ्यायला लावली. बार्टी संस्थेचे ब्रिजलाल पाडवी समतादूत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधीक्षक बालाजी रसाळ यांनी तर आभार अधिक्षिका दिपाली पाटील यांनी मानले.कार्यक्रमाला पोलीस हवालदार संतोष राठोड, बालाजी रसाळ दिपाली पाटील यशवंत वळवी,भैया अहिरे,प्रताप वसावे,सिताराम झांबरे, शिवलाल गावित,बहादुर पाडवी आदीसह कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.