
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम: रोगराई मुक्त गाव करण्यासाठी गावागावात आरोग्य शिबिराचे आयोजन करणे काळाची गरज आहे, त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे, याचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ नेते बाळासाहेब क्षीरसागर यांनी इट येथील आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
शनिवार दिनांक 24 जून 2022 रोजी ईट तालुका भूम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे युवानेते मल्हार दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य व औषध उपचार शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष महादेव वडेकर . भूम शहर अध्यक्ष शंकर खामकर . गजेंद्र धर्माधिकारी. संतोष आवताडे. पंचायत समिती माजी उपसभापती काकासाहेब चव्हाण . ज्येष्ठ नेते राजसिंह पांडे. सुरेंद्र बोंदाडे यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबिरासाठी मुंबई येथील त्वचारोग तज्ञ डॉक्टर केटकी संखे. स्त्री रोग तज्ञ डॉक्टर मानसी गणवीर . बालरोग तज्ञ डॉक्टर राज मोहिल . सर्जरी तज्ञ डॉक्टर सुमेर शेख. निशिकांत लोकरे. अमर चव्हाण . महेश तेरकर यांनी उपस्थिती लावली होती.
भूम तालुक्यात यापूर्वी एका आठवड्यात डोकेवाडी. भुम . वालवड . आंबी येथे जवळपास 963 रुग्णांची तपासणी करण्यात येऊन मोफत उपचार केले. या दरम्यान आवश्यक त्या रुग्णांना आवश्यक ते ऑपरेशन करण्या संदर्भात रेफर करण्याच्या सूचना देण्यात आल्या व मोफत ऑपरेशन सुविधा मुंबई येथे उपलब्ध करून दिली असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. शिवाय मुंबई येथे रुग्णांसाठी व त्यांच्या समवेत एका व्यक्तीची जाण्या-येण्याची, राहण्याची, जेवणाची, निवासाची मोफत सोय करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.