
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भुम:- भूम-परंडा-वाशी आ.प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या समर्थनार्थ भव्य रॅलीचे आयोजन सोमवारी दिनांक २७/०६/२२ सोमवार रोजी करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यतील राजकीय परिस्थिती पाहता म.वि.आ.मध्ये सतत दूजाभाव मिळत आल्यामुळे, योग्य न्याय मिळत नसल्यामुळे शिवसेनेतून एकनाथ शिंदे गट निर्माण झाला. या गटाला जाहीर असा पाठींबा आ.तानाजी सावंत यांनी दिली. भुम- परांडा वाशी येथे त्यांचे असंख्य समर्थक आहेत. त्यांच्या समर्थनात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी ग्रामीण भागासह, शहरातील असंख्य नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन न.प.गटनेते विकासरत्न संजय नाना गाढवे यांच्या वतीने करण्यात आले आहे.