
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेतील बंड केलेले नेते एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
ठाकरे यांना काल रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी फोनवरुन राज ठाकरे यांच्या तब्येतीची आणि राज्यातील राजकीय परिस्थिती संबंधी चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांनी फोनवरुन सध्याच्या राजकारणा संदर्भात बोलले असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडखोरी केली आहे, सध्या एकनाथ शिंदे यांना वेगळा गट स्थापन करायचे आहे, त्यामुळे ही फोनवरील चर्चा राजकीय वर्तुळात महत्वाची मानली जात आहे.