
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
एखाद्या लोक संस्कृतीला पाच हजार वर्षे उलटून गेली तरी एखाद्या परंपरेचे सातत्य कसे टिकून राहते हे आपणास वरील ओळीतून दिसते.
आज मानवाने आपल्या बुद्धीला ज्ञानाच्या बळावर चंद्राशी नाते जोडले आहे परंतु याच वेळी अतिप्राचीन अशा सिंधू संस्कृतीशी जुळलेली नाळ ही तोडली नाही. त्यावेळी लोक आपल्या डोक्यावर दोन शिंगे धारण करत असत दोन शिंगांची जागा आज बाशिंगाणे घेतली आहे .पूर्व सुरींनी घालून दिलेल्या अश्या कितीतरी रूढी परंपरा वेगळ्या स्वरूपात का होईना परंतु त्याच श्रद्धा भावाने माणूस आज ही जोपासून आहे. प्रत्येक बदलामागील मुलतत्वे मात्र कायमच असतात.
म्हणी या लोक जीवनाचा एक भाग झालेला दिसून येतो म्हणी मानवी स्वभाव विशेष अचूक पकडतात जसे पावसाचे अनुमान मांडणाऱ्या ह्या म्हणी केवळ पावसाविषयी सांगून त्यातच विरघळून जात नाहीत तेवढ्याच ताकदीने मानवी मनोवृत्तीचे दिग्दर्शनही करतात. वाद्य वाजले की नर्तकीचा पाय फेर धरून नाचू लागतो. निवडणुकीचे पडघम वाजू लागले की गल्लीबोळात पुढाऱ्यांची पैदास एकदम होऊ लागते हा मानवी स्वभाव विशेष म्हणजे म्हणी अचूक पकडतात. आपल्या पात्रतेहून अधिकाचा हव्यास धरणाऱ्या वृत्तीची टिंगल करण्यासाठी बहिणाबाई चौधरी यांनी शिदोकाचा सुंदर वापर केला आहे. म्हणींची निर्मिती कशी झाली हे सांगणे शोधणे सोपे नाही वयोवृद्ध लोक म्हणतात वातावरण हवामानाची स्थिती वारा वाहण्याची दिशा पक्ष्यांच्या हालचाली इत्यादी लक्षात घेऊन अंदाज बांधत असतात.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकांच्या ओठावर अशी असंख्य वचन रुळलेली आढळतात काहीजण म्हणतात म्हणी ह्या खूप जुन्या ग्रंथातून आल्या आणि लोकांच्या जिभेवर त्यात चांगल्या रूळल्या. म्हणीमुळे मानवांना जीवन जगण्यासाठी ज्या मार्मिक गोष्टी पाहिजे असतात त्या ह्या म्हणी मधून मिळतात.
म्हणी शब्दाची ही बिनचूक रेखीव शास्त्रशुद्ध व्याख्या नसुन म्हणींची बिनचूक व्याख्या करावयास अजून पर्यंत तरी यश मिळाले नाही कारण म्हणीत कोण कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत व कोणत्या नसल्या तरी चालतील धर्म नीती व्यवहार वगैरे संबंधाचा बोध म्हणीत ग्रथित असणे आवश्यक आहे .कारण अनेक महत्त्वाच्या गोष्टी संबंधाने विद्वान लोकात तीव्र मतभेद आहे तथापि सर्वांना संमत अशी म्हणी ची लक्षणे एकत्र करू लागलो तर लघुता व्यवहारिकता आणि लोकमान्यता हे तीन गुण म्हणी मध्ये असणे आवश्यक असते.
प्रत्येक म्हणीत धर्म व नीती यांचा बोध असलाच पाहिजे असे नाही धर्म व नीती यांच्या जागी व्यवहारांना अनुभव किंवा एखादा चटकदार दृष्टांत असला तरी चालतो उदाहरणार्थ अति तेथे माती ,अचाट खाणे मसणात जाणे, गरजवंताला अक्कल नसते ,पळसाला पाने तीनच, बळी तो कान पिळी, विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर, कुडास कान ठेवी ध्यान ,गाढवाला गुळाची चव काय वगैरे अशा म्हणी मध्ये जगाचा अनुभव आणि काही समर्पक दृष्टांत भरलेले आहेत कोठेही गेले तरी एक सारखाच प्रकार आढळावयाचा. या गोष्टीला पळसाला पाने तीनच या म्हणी लिहून किंवा ज्यांच्याजवळ सामानसुमान लटावर नाही अशा संबंधाने विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर या म्हणी वरून अधिक समर्पक दृष्टांत सापडणे जसे कठीण आहे.
म्हणी या आज पर्यंत होऊन गेलेल्या लोकांच्या संचित ज्ञानाचा कोश आहे असे म्हटले असता अतिशयोक्ती होणार नाही या ज्ञानाच्या विषयांच्या वर्गीकरणा प्रमाणे म्हणींची ही वर्गीकरण करता येईल म्हणी मुळे व्यक्तींचे ज्ञान वाढत जाते ज्यांना म्हणींचा अर्थ कळतो तू विद्वानांच्या पंगतीमध्ये जाऊन बसतो .म्हणी मध्ये होऊन गेलेल्या घटनेविषयी अर्थ दडून बसलेला असतो ज्यांना तो कळतो निश्चित तो पात्र ठरतो. म्हणी या मानवांना नातेसंबंध टिकून ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात म्हणीचा योग्य अर्थ समजून घेतल्यास निश्चितच व्यक्ती हा पूर्व ज्ञानाची व चालू ज्ञानाशी सांगड घालून चांगल्या प्रकारचे जीवन जगण्यासाठी प्रेरित होऊ शकतो.
लेखक
विक्रम बलभीमराव पाचंगे
प्राथमिक पदवीधर जि प शाळा मानमोडी