
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
————————————————
नांदेड : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासाचा समतोल ठेवत खऱ्या अर्थाने जनसेवा करणारे आमदार बालाजी कल्याणकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा घेतलेल्या निर्णयाला नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील बहुतांश सरपंच , उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. अशी माहिती जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हा आध्यक्ष नारायण कदम यांनी दिली आहे.
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा लोकनेता म्हणून.आ. बालाजी कल्याणकर यांनी नावलौकिक मिळविला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेशी नाळ जुळलेले नेतृत्व म्हणूनही आमदार बालाजी कल्याणकर ओळखले जातात. ग्रामीण विकासाची खऱ्या अर्थाने जाणीव असणारे आमदार बालाजी कल्याणकर यांनी अवघ्या दोन वर्षाच्या कालावधीत नांदेड शहरालगत असलेल्या सर्वात मोठ्या ग्रामपंचायत वाडी बुद्रुक येथे उपजिल्हा रुग्णालय सुरू करून जनसेवेचा वसा जपला. आतापर्यंत कोणत्याही आमदारास करता आले नाही ते आ. बालाजी कल्याणकर यांनी अवघ्या अडीच वर्षात करून दाखवले त्यामुळे आ. बालाजी कल्याणकर हे खऱ्या अर्थाने लोकसेवक आहेत असा गौरवोद्गार माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे मोठे नेते कमल किशोर कदम यांनी सार्वजनिक कार्यक्रमात केला होता. त्यामुळे आमदार बालाजी कल्याणकर यांचे मोठेपण हे निश्चितपणे मान्य करावे लागते. राज्याच्या हितासाठी आणि आपल्या मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी आमदार बालाजी कल्याणकर यांनी घेतला निर्णय हा निश्चितपणे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या हिताचा असल्याने या हिताच्या निर्णयासाठी नांदेड जिल्हा सरपंच संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे .नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अनेक सरपंचानी आ. कल्याणकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे . यात तळणीचे सरपंच वैजनाथ सूर्यवंशी, धानोऱ्याचे सरपंच बालाजी पोफळे, पिंपरीचे सरपंच हनुमान चंदेल, सायाळचे उपसरपंच होनाजी जामगे, पोखरणीचे सरपंच सचिन पाटील, नीळ्याचे सरपंच रोहित हिंगोले, वडवणा खडकीचे सरपंच संजय पोहरे, उप सरपंच नागोराव कदम यांच्यासह अनेक सरपंच , उप सरपंच यांनी आ. बालाजी कल्याणकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.